खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टरचा साथीदार डी. के. रावच्या पोलीस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 20:57 IST2017-10-18T20:57:02+5:302017-10-18T20:57:32+5:30

खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टर साथीदार डी.के.राव याची पोलीस कोठडी २३ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे

Gangster D. D. K. Rao's police custody extended | खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टरचा साथीदार डी. के. रावच्या पोलीस कोठडीत वाढ

खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टरचा साथीदार डी. के. रावच्या पोलीस कोठडीत वाढ

मुंबई : खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टरचा साथीदार डी.के.राव याची पोलीस कोठडी २३ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे महत्वपूर्ण धागेदोरे मिळवावयाचे असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितल्याने न्यायालयाने त्यांची मुदतवाढीची विनंती मंजूर केली.
गँगस्टर छोटा राजनचा जवळचा साथीदार समजल्या जाणा-या डी.के.रावला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी १२ आॅक्टोबरला अटक केली आहे. मुंबई धारावी परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) एका प्रकल्प सल्लागाराला त्याने ५० लाखांची खंडणी मागितली होती. व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. डी. के. राव यांच्यावर खून, खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी एका खंडणीच्या गुन्ह्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याने पुन्हा बिल्डर, उद्योजकांना धमकावून खंडणी गोळा करण्याचे सुरू केले होते. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याची कोठडी २३ आॅक्टोबरपर्यत मुदत वाढवली.

Web Title: Gangster D. D. K. Rao's police custody extended