The fuss of social distance at Panvel railway station | Panvel railway station : पनवेल रेल्वे स्थानकांत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Panvel railway station : पनवेल रेल्वे स्थानकांत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कळंबोली : पनवेल रेल्वे स्थानकात शुक्रवारी परप्रांतीयांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गोरखपूर एक्स्प्रेस दिवसाआड पनवेल स्थानकातून जाते. त्यामुळे गुरुवारी शुकशुकाट असलेले रेल्वे स्थानक शुक्रवारी परप्रांतीय प्रवाशांनी गजबजून गेले होते. गर्दी तसेच सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात पोलिसांचा दमछाक झाली. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांनीदेखील गर्दी केल्याने रेल्वे परिसरात ठिकठिकाणी परप्रांतीय प्रवासी दिसत होते.
पनवेल रेल्वे स्थानकात शुक्रवारी प्रवाशांची अलोट गर्दी उसळली होती. लॉकडाऊन काळात रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल रेल्वेस्थानकातून जात आहेत. त्यानुसार प्रवासी रेल्वे स्थानकात गर्दी करण्यात येत आहे. घाटमाथ्यावर जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. गोरखपूर एक्स्प्रेस गाडी पनवेल येथून दिवसाआड आहे. परप्रांतीय प्रवासी गावी जाण्यासाठी पनवेल परिसरात येत आहेत. उरण, तळोजा, अलिबाग, पेण, पनवेल ग्रामीण भाग, कळंबोली, कामोठे, पनवेल, या भागातून पनवेल रेल्वे स्थानकात गावी जाण्यासाठी प्रवासी येत आहेत. परिणामी, हजारो परप्रांतीयांनी पनवेलमधून गावाची वाट धरली आहे. रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The fuss of social distance at Panvel railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.