शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

राज्यात सहकाराला मिळेना पूर्ण वेळ आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 8:00 AM

राज्यात नागरी सहकारी बँका, सहकारी गृहनिर्माण संस्था, पतसंस्था, साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, जिल्हा दूध उत्पादक संघ, जिल्हा मध्यवर्ती बँका अशा विविध प्रकारच्या २ लाख १८ हजार सहकारी संस्थांचे जाळे आहे.

ठळक मुद्दे गेल्या आठ महिन्यांपासून महत्त्वाच्या पदाची हेळसांड  महिन्यातील चार ते ८ दिवस मुंबईहून पुण्याला येऊन कामकाजाचा निपटारा

पुणे : सहकारी चळवळीचे देशातील प्रमुख केंद्र असलेल्या महाराष्ट्रातच सहकार आयुक्तपदी पूर्ण वेळ व्यक्ती मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सहकार आयुक्तालयाचा प्रभार मुंबईतील अधिकाऱ्यावर देण्यात आला आहे. महिन्यातील चार ते ८ दिवस मुंबईहून पुण्याला येऊन कामकाजाचा निपटारा सहकार आयुक्तांकडून केला जात आहे.राज्यात नागरी सहकारी बँका, सहकारी गृहनिर्माण संस्था, पतसंस्था, साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, जिल्हा दूध उत्पादक संघ, जिल्हा मध्यवर्ती बँका अशा विविध प्रकारच्या २ लाख १८ हजार सहकारी संस्थांचे जाळे आहे. राज्यातील निम्मी लोकसंख्या सहकाराशी संबंधित आहे. या पुर्वीचे सहकार आयुक्त डॉ. विकास झाडे यांची २० सप्टेंबर २०१८ रोजी बदली झाली. त्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक आणि अतिरिक्त आयुक्त सतीश सोनी यांच्याकडे सहकार आयुक्त पदाची धुरा देण्यात आली. मुंबई बाजार समितीची जबाबदारी असल्याने सहकार आयुक्त सोनी हे दर आठवड्यातील गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयात उपलब्ध असतात. त्यातही बहुतांशवेळा प्रत्येक गुरुवारीच त्यांची उपस्थिती सहकार आयुक्तालयात असते, अशी प्रतिक्रिया आयुक्तालयात विविध दाव्यांच्या सुनावणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी दिली. गुरुवारी सकाळी नऊ ते रात्री उशीरा पर्यंत कार्यालयात असतात. मात्र, भेटण्यास येणारे नागरीक, दाव्यांची सुनावणी आणि कामाची व्याप्ती पाहाता कमी कालावधीत कामांचा उरक करणे शक्य नसल्याची प्रक्रिया देखील काही अपिलार्थींनी दिली. -------------अशी आहे सहकार आयुक्तांवर जबाबदारी सहकारी संस्था नोंदणी, सभासदांचे अधिकार, संस्थांच्या सवलती, संस्थांच्या मालमत्ता आणि निधी  संस्थांचे व्यवस्थापन, लेखापरिक्षण, चौकशी व तपासणी, संस्थेतील वाद, संस्था अवसायनास घेणे, गुन्हा आणि शिक्षांचे अपिल, आढावा, पूनर्निरिक्षण याची जबाबदारी सहकार आयुक्तांवर असते. कृषी औद्योगिक क्षेत्रात ग्रामीण पत पुरवठा, प्राथमिक कृषी सहकारी संस्था, बँकिंग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, औद्योगिक संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि ज्या संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० आणि नियम १९६१ खाली चालते. त्यांच्या नियंत्रणाची जबाबदारी आयुक्तांवर आहे. या शिवाय महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६०, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा १९६३, मुंबई सावकारी कायदा, मुंबई वखार कायदा १९५९ आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या अंमलबजावणीचे काम आहे. 

टॅग्स :PuneपुणेbankबँकSugar factoryसाखर कारखाने