शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

देशात जानेवारी अखेरपर्यंत २० हजार कोटींची एफआरपी थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 22:05 IST

साखर आयुक्तालयाने ३९ साखर कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) बजावले.  

ठळक मुद्देसाखरेचे उत्पादन पोहोचले १८५ लाख टनांवर

पुणे : देशात जानेवारी अखेरीस ५१४ साखर कारखान्यांमधून १८५.१९ लाख टन साखर उत्पादित झाली असून, गेल्या वषीर्पेक्षा १४ लाख टन साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. उसाची रास्त आणि किफायतशीर (एफआरपी) दराची देशपातळीवर तब्बल २० हजार कोटी रुपयांची रक्कम जानेवारी अखेरीस थकीत असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडून (इस्मा) देण्यात आली. ऊस गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. राज्यात १५ जानेवारी अखेरीस ५ हजार ३२० कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी होती. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी एफआरपीसाठी आंदोलन सुरु केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २७ जानेवारीला साखर आयुक्तालयावर हल्लाबोल आंदोलनही केले. त्यानंतर साखर आयुक्तालयाने ३९ साखर कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावले.  राज्यात १५ जानेवारी अखेरच्या गाळपानुसार ३१ जानेवारी अखेरीस सुरु असलेल्या १९० साखर कारखान्यांकडे १३ हजार ३०५ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपये शेतकºयांना देण्यात आले आहेत. शेतकºयांनी केलेल्या आंदोलनानंतर कारखान्यांनी ३ हजार २९७ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.  दरम्यान,राज्यात १९१ साखर कारखान्यांमधून १ फेब्रुवारी अखेरीस ६६१.१८ लाख टन ऊस गाळपातून, ७१ लाख टन साखर उत्पादित झाली. उत्तर प्रदेशात ११७ साखर कारखान्यांमधून ५३.३६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात ११९ कारखान्यांमधून ५३.९८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या सरासरी उताºयात ०.८१ टक्के वाढ झाल्याने उत्तरप्रदेशाने गेल्यावषीर्ची उत्पन्नाची सरासरी गाठली आहे. कर्नाटकमध्ये ६५ कारखान्यांनी ३३.४०, तमिळनाडूतील २९ कारखान्यांनी ३.१०, गुजरामतमधील १६ कारखान्यांनी ६.५० आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील २४ साखर कारखान्यांनी ३.७० लाख टन साखरेचे उत्पादन जानेवारी अखेरीस घेतले आहे. बिहारमधे ४.०८, उत्तराखंड १.७५, पंजाब २.९०, हरयाणा २.९०, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील कारखान्यांमधून २.६० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ---साखरेची किमान किंमत हवी ३५ ते ३६ रुपये किलोसाखरेची किमान आधारभूत किंमत २९०० रुपये प्रतिक्विंटल आहे. कारखान्यांमध्ये सध्या २९ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने साखरेची विक्री सुरु आहे. साखरेच्या उत्पादन खचार्पेक्षा हा दर ५ ते सहा रुपये प्रतिकिलोने कमी आहे. त्यामुळे साखरेची किमान आधारभूत किंमत ३५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल (३५ ते ३६ रुपये किलो ) केली पाहिजे. तरच, शेतकºयांची उसाची देणी कारखान्यांना देता येईल, असे इस्माचे म्हणणे आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी