शहरं
Join us  
Trending Stories
1
चार माेठे पाऊस पूर आणणार; मुंबईत मान्सून पॅटर्न बदलतोय, हवामान तज्ज्ञांचा इशारा 
2
Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव
3
तीन पट सॅलरी, टॅक्स फ्री इनकम...! भारतीयांच्या बळावर चालतो कुवेत, जाणून घ्या किती मिळतं वेतन?
4
पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये १५% वाढ; दारूगोळा, हत्यारे खरेदीसाठी ५४८ अब्जची तरतूद!
5
जी-७ शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी इटलीला रवाना, जॉर्जिओ मेलोनी यांची घेणार भेट!
6
मराठमोळ्या खेळाडूवर ५ वर्षात दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया; स्वत: दिली महत्त्वाची अपडेट!
7
फिल्म सिटीबाहेर कचऱ्याचा ढीग! शशांक केतकर संतापला, म्हणाला- "गेल्या १० वर्षात ही जागा कधीच स्वच्छ..."
8
WI vs NZ : वेस्ट इंडिजचा 'सुपर' विजय! न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर; यजमानांचा झंझावात
9
वादग्रस्त कारकिर्दीनंतर डॉ. संजीव ठाकूर पुन्हा सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रुजू होणार!
10
‘ॲक्टोसाइट’मुळे होणार रेडिओथेरपी अधिक सुसह्य, दुष्परिणाम कमी करणारे औषध बाजारात ; एफएसएसएआयची मान्यता
11
'आमचा विरोध नाही, पण...'! UCC संदर्भात JDU नेत्याचं विधान, भाजपचं टेन्शन वाढणार
12
पंजाब CM भगवंत मान यांनी तुरूंगात घेतली अरविंद केजरीवालांची भेट, मोठा निर्णय होणार?
13
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' फेम अभिनेत्यावर कोसळलं आर्थिक संकट; भाड्याच्या घरात रहायची आली वेळ
14
महिलांना ५० हजार रुपयांचे कॅश व्हाउचर, जगन्नाथ मंदिरासाठी ५०० कोटी; ओडिशाच्या माझी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमधील निर्णय
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२४ : घरात सुखशांती नांदेल, शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील
16
ऐतिहासिक! रोहितने गांगुलीची 'दादा'गिरी संपवली; असं करणारा ठरला पहिला भारतीय कर्णधार
17
पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये घुसले; छावण्या, रेल्वेवर हल्ल्याची भीती, लष्कर सतर्क
18
कंगनावर झालेल्या हल्ल्यानंतर दिग्दर्शक करण जोहरची प्रतिक्रिया, म्हणाला - "मी कोणत्या प्रकारच्या"
19
WI vs NZ : ६ षटकार! न्यूझीलंडचा सांघिक खेळ; पण वेस्ट इंडिजकडून एकट्याने किल्ला लढवला
20
अकरावी-बारावीसाठी हजार रुपये, तर पदव्युत्तरसाठी मुलींना २,५०० रुपये, आसाम सरकार देणार विद्यावेतन

पीएम आवास योजनेतून आता कुटुंबासाठी बहुमजली इमारत, कुटुंबप्रमुखाव्यतिरिक्त अन्य व्यक्तींनाही मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 5:31 AM

केंद्र सरकारकडून प्रत्येकाला घर, हे ध्येय समाेर ठेवण्यात आले असून, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत यासाठी अर्थसाहाय्य पुरविण्यात येत आहे.

मनाेज माेघेकेंद्र सरकारकडून प्रत्येकाला घर, हे ध्येय समाेर ठेवण्यात आले असून, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत यासाठी अर्थसाहाय्य पुरविण्यात येत आहे. घर घेऊ इच्छिणाऱ्या किंवा ते बांधू इच्छिणाऱ्यांसाठी या योजनेतील अर्थसाहाय्यामुळे दिलासा मिळत आहे. शहरी भागात घर बांधणाऱ्यांसाठी आता ही योजना अधिक सुलभ करण्यात आली आहे. यामुळे शहरी भागात ज्या कुटुंबाची जागा आहे, अशा जागेवर कुटुंबाची बहुमजली इमारत बांधण्याची परवानगी गृहनिर्माण विभागाने घेतली आहे. आतापर्यंत कुटुंबातील एकाच व्यक्तीला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येत होता. मात्र, आता कुटुंबातील अन्य पात्र लाभार्थ्यांना या बहुमजली इमातीतील घरासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध होईल. 

आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबप्रमुखाच्या नावावरच संपूर्ण जागा असल्याने योजनेसाठी पात्र असूनही कुटुंबातील अन्य व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. 

कोण असेल लाभार्थी?

  • लाभार्थी पती, पत्नी वा अविवाहित मुलगी/मुलगा असू शकते.
  • लाभार्थ्यांकडे पक्के घर नसावे.
  • पक्के घर नसल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, बँक खाते तपशील, उत्पन्नाचा दाखला
  • एका पात्र लाभार्थ्याला घरबांधणी किंवा नूतनीकरणासाठी १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. यानुसार एका कुटुंबात जितके पात्र लाभार्थी त्या प्रमाणात हे अनुदान उपलब्ध होणार आहे. मैदानी भागात ७० हजारांपासून ते १.२० लाख, डोंगराळ प्रदेशात १.३० लाख प्रति लाभार्थी अनुदान मिळू शकते.
  • राज्य सरकारने या योजनेंतर्गत डिसेंबर २०२४ पर्यंत ३.७५ लाख घरे बांधण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. आतापर्यंत राज्यात तब्बल २.४९ लाख घरे बांधकामाच्या विविध टप्प्यांत आहेत.

राज्यात शासन निर्णय जारी योजना (शहरी) अंतर्गत बहुमजली बांधकाम करण्यास परवानगी देण्याची बाब विचाराधीन होती. केंद्राच्या सुधारणांनुसार राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागानेही योजनेत सुधारणा करून याविषयीचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे सामायिक जागेवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बहुमजली इमारत बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनprime ministerपंतप्रधानGovernmentसरकार