शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसमधून बारावीपर्यंत मुलींना मोफत प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 18:16 IST

राज्यातील इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलींना यापुढे एसटी महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांना शिवशाही वातानुकूलित बसमध्ये तिकीट दरात ४५ टक्के सवलत क्षयरोग व कर्करोगग्रस्त प्रवाशांची सवलत  ७५ टक्क्यांपर्यंत वाढ६५ टक्के किंवा अधिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या साथीदारालाही ५० टक्के सवलत

पुणे : राज्यातील इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलींना यापुढे एसटी महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. यापुर्वी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींना सवलत दिली जात होती. तसेच ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही वातानुकूलित बसमध्ये तिकीट दरात ४५ टक्के सवलत मिळेल. तसेच क्षयरोग व कर्करोगग्रस्त प्रवाशांची सवलत  ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच एक नवीन योजनाही सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचा अहवाल विचारात घेऊन या सुधारणा करण्यात आल्या आहेत. पुर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व २६ योजना यापुढेही सुरूच राहणार आहेत. अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेअंतर्गत आतापर्यंत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाची सवलत दिली जात होती. नवीन सुधारणेनुसार ही सवलत इयत्ता बारावीपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे लाखो मुलींना या सवलतचा फायदा मिळणार आहे. राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्वसाधारण व निम-आराम बसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जात होती. आता शिवशाही या वातानुकूलित बसमध्येही ज्येष्ठांना ४५ टक्के सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त रुग्णांना पुर्वी प्रवासात ५० टक्के सवलत होती. ही सवलत आता ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. अंध तसेच अपंग व्यक्तींना देण्यात येणारी ७५ टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, १०० टक्के अपंगत्व किंवा पुर्णपणे परावलंबी असणाऱ्या अपंग व्यक्तीच्या साथीदारालाच पुर्वी ५० टक्के सवलत मिळत होती. त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली असून ६५ टक्के किंवा अधिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या साथीदारालाही ५० टक्के सवलत मिळणार आहे. -----------------नवीन सवलत योजना -शालेय शिक्षण विभागाने इयत्ता दहावीमध्ये अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य सेतु अभियान सुरू केले आहे. या योजनेमध्ये १११ प्रशिक्षण केंद्र आहेत. या केंद्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी मोफत प्रवास सवलत दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना तिकीट दरात ६६.६७ टक्के सवलत दिली मिळणार आहे. ------------

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळDiwakar Raoteदिवाकर रावतेSchoolशाळाStudentविद्यार्थी