शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

आदिवासी विद्यार्थ्यांना विनाअट शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 2:46 AM

संभ्रम दूर; ८० टक्के उपस्थितीची अट सरकारने केली शिथिल

साईनाथ कुचनकारचंद्रपूर : शाळेत ८० टक्के उपस्थिती असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी कोरोनामुळे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे   शिष्यवृत्ती मिळेल की नाही, असा संभ्रम होता. मात्र, शासनाने विनाअट शिष्यवृत्ती देण्याचे नुकतेच जाहीर केल्यामुळे राज्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अनुसूचित जमातीतील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी तत्कालीन राज्य सरकारने २०१० मध्ये सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. यासाठी ८० टक्के उपस्थितीची अट आहे. दरवर्षी मुख्याध्यापकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्यानंतर ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केली जाते. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे शाळा पूर्णपणे सुरूच झाल्या नाहीत. जे वर्ग सुरू झाले त्यामध्ये पूर्ण क्षमतेने विद्यार्थी उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे. तर पहिली ते चौथीच्या शाळा सुरूच झाल्या नसल्याने ८० टक्के उपस्थितीच्या अटीमुळे यावर्षी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. आदिवासी विकास विभागाने एक पत्र काढून उपस्थितीबाबतची अट शिथिल केल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मि‌ळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कोरोना संकटामुळे पहिली ते चौथीच्या शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे हजारो विद्यार्थी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र शासनाने उपस्थितीच्या अटीमध्ये शिथिलता दिल्यामुळे लाभ मिळणार आहे.- जे. डी. पोटे, शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर.