शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

बनावट कागदपत्रावरून लातुरात एकाची फसवणूक, न्यायालयाच्या आदेशाने चाैघांवर गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: October 15, 2022 00:00 IST

बनावट कागदपत्राच्या आधारे लातुरात एकाची फसवणूक केल्याची घटना २२ जून २०१७ ते १३ ऑक्टाेबर २०२२ या कालावधीत घडली.

लातूर : बनावट कागदपत्राच्या आधारे लातुरात एकाची फसवणूक केल्याची घटना २२ जून २०१७ ते १३ ऑक्टाेबर २०२२ या कालावधीत घडली. याबाबत लातूर येथील न्यायालयाच्या आदेशाने एमआयडीसी पाेलीस ठाण्यात चार जाणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी दिलेली माहिती अशी,  शेख अन्सार मन्सूर (४४, रा. गिरवलकरनगर, लातूर) यांनी पाेलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी व्यवसायातील काही आर्थिक अडचणींमुळे प्रशांत भागवत ईरलापल्ले (रा. श्रीनगर, लातूर) यांच्याकडून २२ जून २०१७ राेजी राेख ६ लाख रुपये १०० दिवसांमध्ये परत करण्याच्या अटीवर घेतले हाेते. दरम्यान, ही रक्कम घेताना फिर्यादीने प्रशांत ईरलापल्ले यास तारण म्हणून काेरे स्वाक्षरी केलेले धनादेश दिले हाेते आणि १०० रुपयांचा बाॅण्डपेपर ज्यावर फिर्यादीची स्वाक्षरी असलेली अशी कागदपत्रे दिली हाेती. 

दरम्यान, फिर्यादी शेख याने घेतलेली राेख रक्कम ६ लाख रुपये १०० दिवसांमध्ये परत केली. त्यानंतर तारण म्हणून ठेवलेले काेरे स्वाक्षरी केलेले धनादेश, बाॅण्डपेपर आदी कागदपत्रे परत मागितली असता, ती कागदपत्रे देण्यास नकार दिला. प्रशांत ईरलापल्ले याने पिराजी माणिक मेकले (रा. रमजानपूर, ता. लातूर), चेतन तुकाराम आकनगिरे (रा. कामखेडा राेड, रेणापूर) आणि हरिओम शरदराव भगत (रा. श्रीनगर, लातूर) यांच्याशी संगनमत करून दहा लाख रुपये देणे असल्याबाबतची खाेट्या आशयाची नाेटीस तयार करून, पाठवून काेऱ्या धनादेशाचा दुरुपयाेग करून फिर्यादीची फसवणूक केली. शिवाय, विश्वासघात करून वैयक्तिक पैशाच्या हव्यासापाेटी बनावट कागदपत्र तयार करून त्याचा वापर केला.

याबाबत फिर्यादीने लातूरच्या न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. याप्रकरणी लातूर येथील न्यायालयीन क्रमांक -२ यांच्या आदेशानुसार कलम १५६ (३) सीआरपीप्रमाणे एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुरुवारी गुरनं. ५७९ /२०२२ कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस उपनिरीक्षक संदीप कराड करत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस