औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना भरधाव वाहनाने चिरडले, चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 10:27 IST2017-09-16T08:04:40+5:302017-09-16T10:27:32+5:30
औरंगाबाद शहरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघाजणांना भरधाव वाहनाने चिरडले.

औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना भरधाव वाहनाने चिरडले, चौघांचा मृत्यू
औरंगाबाद, दि. 16 - औरंगाबाद शहरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघाजणांना भरधाव वाहनाने चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतं आहे. जालना रोडवरील केंब्रिजशाळेजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असून अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे.
(मृत भागिनाथ लिंबाजी गवळी)
भागिनाथ लिंबाजी गवळी (वय 56), नारायण गंगाराम वाघमारे (वय 65), दगडुजी बालाजी ढवळे (65),आणि अनिल विठ्ठल सोनवणे (45, सर्व राहणार हनुमान चौक, चिकलठाणा) अशी मृतांची नावे आहेत. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला आहे.
(मृत नारायण गंगाराम वाघमारे)
सर्व मृतदेह घाटी रुग्णालयात ठेवण्यात आले असून, वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. फरारवाहनचालकाचा शोध सुरु आहे. स्कॉर्पिओ गाडीने हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या गाडीचा नंबर MH27-AV 5282 असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळते आहे.
(मृत दगडुजी बालाजी ढवळे)
मॉर्निग वॉक करत असताना गाडीने धडक दिल्याने या चारही जणांचा मृत्यू झाला आहे.
(मृत अनिल विठ्ठल सोनवणे)