चार दिवस पावसाचे; परतीचा पाऊस वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 09:20 IST2022-10-07T09:19:43+5:302022-10-07T09:20:18+5:30
पुढील चार दिवसांसाठी मुंबईसह राज्यात बहुतांश जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

चार दिवस पावसाचे; परतीचा पाऊस वाटेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी ठिकठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली असतानाच आता पुढील चार दिवसांसाठी मुंबईसह राज्यात बहुतांश जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, परतीचा पाऊस गुजरात, मध्य व उत्तर प्रदेशमध्ये आहे. एव्हाना तो महाराष्ट्रात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र हवामानात सातत्याने बदल होत असल्याने अजून परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल झालेला नाही.
मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र दिवसभर पावसाचे ढग मुंबईवर होते. सकाळी पडलेला पाऊस वगळला तर फार काही पावसाची नोंद झाली नाही.
महाराष्ट्रात फार मोठी वातावरणीय प्रणाली आहे, असे नाही. खूप मोठा पाऊस आहे, अशा पद्धतीचे वातावरणही नाही. कारण ग्रामीण भाषेतील शेतकऱ्यांत मराठी शब्द आहे की, पावसापेक्षा गडगडाटीचे काहूर जास्त आहे त्या पद्धतीचे वातावरण समजावे. पावसाची शक्यता ३० ते ३५ टक्के जाणवते. एकदम उघडीपीची वाट बघायची असेल तर आठवड्याच्या पुढे कमी अधिक काळ वाट बघावी लागेल. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"