शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 08:57 IST

Shiv Sena UTB and MNS Alliance News: उद्धवसेना आणि मनसे यांच्या युतीची चर्चा गेले काही दिवस सर्वसामान्यांमध्ये होत आहे. याच पार्श्वभूमीवर...

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव घेऊन कोण जाणार ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या माजी नगरसेवकांना मनसेशी युती करायची का? अशी विचारणा केली आणि माजी नगरसेवकांनीही निवडून येण्याच्या आशेवर सकारात्मक प्रतिसाद देत, मुंबईत युती केल्यास निश्चित फायदा होईल, असे मत व्यक्त केले. उद्धवसेना आणि मनसे यांच्या युतीची चर्चा गेले काही दिवस सर्वसामान्यांमध्ये होत आहे. मनसेकडून याबाबत आधीच भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

२०१४ आणि २०१७ मध्ये मनसेने युतीबाबत प्रस्ताव दिला, मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून युती करण्याबाबत प्रस्ताव आल्याशिवाय मनसेकडून प्रतिसाद दिला जाणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. 

अनेक माजी नगरसेवक शिंदे गटाकडे गेल्यानंतर, गेले वर्षभर मागणी करीत असलेल्या माजी नगरसेवकांचे म्हणणे ऐकण्यासाठी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक मातोश्री निवासस्थानी बुधवारी घेतली. यापुढे माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे बसून जनतेची गाऱ्हाणी ऐकावीत, यासाठी निवडणूक कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.

विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय नाहीतुम्ही निष्ठावंत आहात, या कठीण काळात सोबत राहिलात, असे म्हणत, तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय युतीचा निर्णय घेतला जाणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी या माजी नगरसेवकांना दिली. यामुळे माजी नगरसेवकांची नाराजी काही प्रमाणात दूर झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या महिन्यात नाराजीमुळे सर्व पदांचा राजीनामा दिलेल्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांच्याबाबत साशंकता व्यक्त होत होती; मात्र त्या बैठकीला मातोश्रीवर गेल्या होत्या, अशी माहिती शिवसेना उपनेते आणि तेजस्विनी यांचे सासरे विनोद घोसळकर यांनी दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र