शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:49 IST

Sudhakar Badgujar joins BJP: सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबई : माजी मंत्री बबनराव घोलप, नाशिकमधील उद्धवसेनेचे निलंबित नेते सुधाकर बडगुजर, माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी महापौर नयना घोलप आदी नाशिकच्या नेत्यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘या प्रवेशाबद्दल आपल्याला माहिती नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सकाळी म्हणाले पण दुपारी त्यांनी बडगुजर यांच्या गळ्यात कमळाचा दुपट्टा टाकून त्यांना प्रवेश दिला.

घोलप, बडगुजर, मुर्तडक आदी नेते नाशिकहून सकाळीच मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हा बावनकुळे यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या प्रवेशाची आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितले. नाशिकच्या भाजप आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या प्रवेशाला प्रचंड विरोध करणारी मोहीम गेले काही दिवस उघडली होती. बडगुजर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्यांना पक्षात कोणत्याही परिस्थितीत पक्षात घेता कामा नये असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, बडगुजर यांना पक्षात आणण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन विशेष आग्रही होते.

शेवटी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रदेश कार्यालयात भाजप प्रवेशाचा कार्यक्रम झाला. बडगुजर यांच्यामुळे भाजपला नाशिकमध्ये मोठी ताकद मिळेल. स्थानिक नेत्यांनी आपसातील मनभेद आणि मतभेद बाजूला सारून महापालिका निवडणुकीत पक्षाच्या प्रचंड विजयासाठी एकत्र यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. महाजन यांनी नाशिक महापालिकेत शंभरवर जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. घोलप, बडगुजर यांचीही भाषणे झाली.

दाऊदलाही घेणार का?- हर्षवर्धन सपकाळसुधाकर बडगुजर यांचे कुविख्यात दाऊद इब्राहिमचा हस्तक सलिम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचे भाजप-शिंदेसेनेच्या नेत्यांनी विधानसभेत म्हटलेले होते. आज त्याच बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. आता दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांनी दाऊदचा गुंड सलीम कुत्तासाठी पार्टी दिली होती असा गंभीर आरोप केला. पार्टीत नाचतानाचे फोटो विधानसभेत दाखवून कारवाईची मागणी केली होती त्याचे काय, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना