शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड कालवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 09:29 IST2018-12-14T09:29:29+5:302018-12-14T09:29:44+5:30
शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय रावसाहेब बंड यांचे गुरुवारी रात्री ९च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड कालवश
अमरावती : शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय रावसाहेब बंड यांचे गुरुवारी रात्री ९च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. संजय बंड यांची दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना छातीचा त्रास वाढला होता, शिवाय या काळात झोपही झालेली नव्हती.
श्रीविकास कॉलनी येथील त्यांच्या घर वजा कार्यालयातून रात्री ८.३० च्या सुमारास ते त्यांच्या कॅम्प स्थित सदनिकेत पोहोचले. मात्र घरी पोहोचताच अवस्थ वाटू लागल्याने त्यांना रुख्मिणीनगर स्थित डॉ. प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉ. कडू यांनी त्यांची तपासणीही केली. इंजेक्शन देण्याची तयारी सुरू असताना बंड यांना तीव्र झटका व त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.
जिल्ह्यातील वलगाव मतदार संघाचे सन १९९५ ते ९९, १९९९ ते २००४ व २००४ ते २००९ अशी सलग १५ वर्षे त्यांनी आमदारकी भूषविली. विद्यार्थी दशेपासून शिवसेनेशी जुळलेल्या बंड यांची मातोश्रीशी जवळीक होती. तर अमरावती जिल्ह्यातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.