शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

महाआघाडीत पुन्हा बिघाडी? आव्हाडांच्या इंदिरा गांधींबद्दलच्या 'त्या' विधानानं नव्या वादाला फोडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 22:12 IST

जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं नवा वाद होण्याची शक्यता

मुंबई: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानामुळे महाआघाडीत पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करून देशातल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वक्तव्य आव्हाड यांनी बीडच्या संविधान महासभेत केलं. या विधानावरुन काँग्रेस हायकमांडकडून काय भूमिका घेतली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.'इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नव्हतं. मात्र अहमदाबाद, पाटण्यातल्या विद्यार्थ्यांनी हिंमत दाखवली होती. यानंतर जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन पुकारलं होतं. आताही देशात तशीच परिस्थिती आहे. जेएनयू, जामिया, जादवपूर विद्यापीठांचे विद्यार्थी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. ते थेट सरकारला आव्हान देत आहेत. लोकांना कायदा समजवून सांगत आहेत. आता त्यांची संख्या कमी असेल. मात्र यातूनच नवे नेते घडतील,' असं आव्हाड यांनी संविधान महासभेला संबोधित करताना केलं. जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेलादेखील या वादात ओढण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र आव्हाड खरं बोलले. त्यांच्या विधानाशी शरद पवार आणि शिवसेना सहमत असेल, असं सोमय्या यांनी म्हटलं. याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेल्या विधानावरुन मोठा वाद झाला होता. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला पायधुनीमध्ये भेटायला जायच्या, असा खळबळजनक दावा राऊत यांनी लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात केला होता. या विधानाबद्दल काँग्रेसकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. यानंतर राऊत यांनी त्यांचं विधान मागे घेतलं. 

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडIndira Gandhiइंदिरा गांधीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत