उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना भाकरी फिरवणार; कोणाकडे देणार जबाबदारी? निर्णय झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 22:49 IST2025-03-03T22:48:29+5:302025-03-03T22:49:02+5:30

जळगाव लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद हे विधानसभा निवडणुकीपासून रिक्त होते.

Former MP Unmesh Patil will be given the responsibility of North Maharashtra from Uddhav thackeray shiv Sena | उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना भाकरी फिरवणार; कोणाकडे देणार जबाबदारी? निर्णय झाला!

उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना भाकरी फिरवणार; कोणाकडे देणार जबाबदारी? निर्णय झाला!

Shiv Sena Uddhav Thackeray: लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जळगाव जिल्हा संघटनेत अखेर फेरबदल करण्यात येणार आहेत. नाशिक येथे पार पडलेल्या बैठकीत संघटनेत बदल करण्याबाबत चर्चा झाली असून, लवकरच याबाबतची अंमलबजावणी पक्षाकडून करण्यात येणार असल्याची माहिती उद्धवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे उद्धव सेनेकडून उपनेतेपद दिले जाणार असून, त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. उद्धवसेनेतील जळगाव लोकसभा मतदारसंघातील जिल्हाप्रमुख पद हे विधानसभा निवडणुकीपासून रिक्त होते. त्यामुळे आता जिल्हाप्रमुखांची नियुक्तीही लवकरच करण्यात येणार आहे. 

जळगाव शहर, अमळनेर व जळगाव ग्रामीणसाठी कुलभूषण पाटील व शरद तायडे यांच्यापैकी एकाची नियुक्ती केली जाणार आहे, तर चाळीसगाव, पाचोरा, पारोळा या मतदारसंघासाठी डॉ. हर्षल माने व उद्धव मराठे यांच्यापैकी एकाची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा प्रवक्ता म्हणून गजानन मालपुरे यांच्या नावाबाबत चर्चा झाली. 

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी उद्धवसेनेत नवीन बदल जाहीर केले जाणार आहेत. नाशिक येथे उत्तर महाराष्ट्राची महत्त्वाची बैठक खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील, करण पवार, हर्षल माने, शरद तायडे, विराज कावडिया, वैशाली सूर्यवंशी, गजानन मालपुरे, कुलभूषण पाटील, दीपक राजपूत यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत या बैठकीत चर्चा झाली.

Web Title: Former MP Unmesh Patil will be given the responsibility of North Maharashtra from Uddhav thackeray shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.