शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिला प्रयोग! बारामतीत पोलिसांसह माजी सैनिक बनले 'कोरोना वॉरियर्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 20:58 IST

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी हे माजी सैनिक देशसेवा म्हणुन विना मोबदला पार पाडणार आहेत..

ठळक मुद्देबारामती शहर तालुक्यात पोलीस ,माजी सैनिक साथसाथदेशात हरियाणामध्ये देखील हा प्रयोग; माजी सैनिकांना कोरोना वॉरियर्स चे ओळखपत्र

प्रशांत ननवरे- बारामती : कोरोनाच्या विरोधात या लढाईमध्ये आता माजी सैनिक 'कोरोना वॉरियर्स' च्या रुपात रस्त्यावर उतरले आहेत. बारामती शहरात आता पोलीस आणि माजी सैनिक साथ साथ कोरोना विरोधी मोहिमेत उतरले आहे.त्यामुळे आता पोलिसांच्या दराऱ्याला सैनिकांच्या शिस्तीची साथ मिळाली आहे.साहजिकच त्यातुन खाकीला बळ मिळाले आहे.पोलिसांचा खाकी आणि माजी सैनिकांचा चित्ता ड्रेस नागरिकांना कोरोनाला अनुकुल वातावरण निर्मिती करणाऱ्या नागरिकांना शिस्तीचे धडे देणार आहेत.सध्या कोरोनाच्या विरोधी लढाईत सर्वसामान्यांपासून ते ज्येष्ठ पर्यंत सर्वजण उतरले आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांबरोबर खांद्याला खांदा लावून अनेक स्वयंसेवक, आरोग्य सेवक कार्यरत आहेत. पोलिसांचे देशातील योगदान पाहता शहरातील जय जवान आजी माजी सैनिक संघटना कोरोना वॉरियर्सच्या रुपात उतरली आहे.या लढाईमध्ये शहरातील रस्त्यावर पोलिसांच्या बरोबर माजी सैनिक दिसु लागले आहेत.बारामती शहर आणि तालुका पोलीस स्टेशन ला ४२ माजी सैनिक कार्यरत होणार आहेत. पोलिसांबरोबर बंदोबस्त करणे,चेक पोस्ट,नेमून दिलेल्या ठिकाणी नागरिकांना मदत करणे, आदी जबाबदारी माजी सैनिकांनी घेतली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी हे माजी सैनिक देशसेवा म्हणुन विना मोबदला पार पाडणार आहेत. शत्रुच्या विरोधातील लढाईनंतर आता देशाचे हे निवृत्त सैनिक निवृत्तीनंतरदेखील देशसेवेसाठी पुढे सरसावले आहेत. पोलीस प्रशासनाने बारामती शहर आणि तालुक्यामध्ये विविध ठिकाणी त्यांना जबाबदारी दिली आहे . उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण  गुजर,पोलीसनिरीक्षक औदुंबर पाटील,पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप आदींच्या मार्गदर्शन खाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात नुकतेच माजी सैनिकांना कोरोना वॉरियर्स चे ओळखपत्र देण्यात आले. यावेळी  सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.व्ही.  शेंडगे आणि बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना चे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर आणि ४२ माजी सैनिक याप्रसंगी उपस्थित होते.या उपक्रमाबाबत माजी सैनिक राहुल भोईटे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले कि, कोरोनाच्या लढाईत संपुर्ण देशात पोलीस बांधवांचा सहभाग कौतुकास्पद आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग आहे. देशात हरियाणामध्ये देखील हा प्रयोग करण्यात आला आहे. केवळ देशहित जोपासणाऱ्या पोलीस बांधवांच्या प्रेरणेतुन आम्ही सर्व माजी सैनिक या उपक्रमात सहभागी झालोआहे.यामध्ये सकाळी ९ ते १ ,सायंकाळी ४ ते ८ या वेळेत पोलिसांसमवेत नाकाबंदी आदी ठिकाणी पोलिसांना मदत करणार आहेत. देशविरोधी शत्रुंना मात देणारे माजी सैनिक कोरोना विरोधी लढाईत निश्चित यशस्वी होतील,असा विश्वास भोईटे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :BaramatiबारामतीIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवार