शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे-अजितदादांना अडकवा, तुम्हाला सोडतो, देशमुखांना होती भाजपची ऑफर; श्याम मानव यांचे खळबळजनक दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 13:19 IST

Anil Deshmukh News: अजित पवारांना अडकवण्यास नकार दिल्यानंतर देशमुख यांच्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यासाठीही दबाव होता, असा दावाही श्याम मानव यांनी केला.

Shyam Manav ( Marathi News ) : "महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडकवण्यासाठी भाजपने गृहमंत्रिपदावर असलेल्या अनिल देशमुख यांना ऑफर दिली होती. मात्र देशमुख यांनी ती ऑफर न स्वीकारता १३ महिने तुरुंगात राहणं पसंत केलं," असा खळबळजनक दावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे. मानव यांच्या या दाव्याला अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिला आहे.

श्याम मानव म्हणाले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बोलावून घेतलं आणि मला गुटखेवाल्यांकडून वसुली करण्याची सूचना दिली. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार हेदेखील होते, असं अनिल देशमुख यांना प्रतिज्ञावर लिहून देण्यास भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. मात्र देशमुख यांनी असं करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यामागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून अटक करण्यात आली. त्यांनी भाजपची ऑफर नाकारल्यामुळे मी त्यांचं जाहीरपणे कौतुक करतो," असा दावा मानव यांनी केला आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी अजित पवारांना अडकवण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यासाठी दबाव होता, असा दावाही श्याम मानव यांनी केला.

श्याम मानव यांच्या या दाव्यावर भाजपच्या गोटातून अद्याप प्रतिक्रिया आली नसून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार अनिल देशमुख यांनी मात्र या दाव्याला दुजोरा दिला आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

"श्याम मानव सांगत आहे ते खरं आहे. देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून सांगितलं होतं की, तुम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्यावर आरोप करा. मात्र तसं करण्यास मी नकार दिला," असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे. 

टॅग्स :shyam manavश्याम मानवAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे