शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वैदी यांचं अपहरण; कुटुंबीयांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 22:13 IST

अनिल देशमुख यांच्या सूनेकडून अशाप्रकारे गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही वेळापूर्वी अनिल देशमुख यांच्या वरळी निवासस्थानाबाहेर ८ ते १० लोकांनी जावई गौरव चतुर्वैदी यांना एका गाडीत बसवून निघून गेले

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांचे जावई गौरव चतुर्वैदी यांचं अपहरण केल्याचा दावा देशमुख कुटुंबीयांनी केलं आहे. १०० कोटी वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी अनिल देशमुख यांची सध्या ईडीकडे चौकशी सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. त्याच दरम्यान अनिल देशमुख यांचे जावयाचं अपहरण झाल्यानं मोठी खळबळ माजली आहे.

अनिल देशमुख यांच्या सूनेकडून अशाप्रकारे गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही वेळापूर्वी अनिल देशमुख यांच्या वरळी निवासस्थानाबाहेर ८ ते १० लोकांनी जावई गौरव चतुर्वैदी यांना एका गाडीत बसवून निघून गेले. याबाबत राहत देशमुख म्हणाल्या की, आमच्या घराबाहेरुन वकील आणि दाजी यांना ८ ते १० लोकांनी गाडीत बसवून घेऊन गेले. ते कुठे गेले, काही फोन कॉल्स नाही. आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. संध्याकाळी ६ वाजता ही घटना घडल्याचं राहत देशमुख यांनी सांगितले आहे.

गौरव चतुर्वैदी यांना कुणी ताब्यात घेतलंय याबाबत सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. सफेद रंगाची इनोव्हा गाडी असल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. कुठलीही नोटीस न देता अशाप्रकारे अज्ञातांनी गाडीत बसवून घेऊन गेले. त्यामुळे अनिल देशमुख कुटुंबाने वरळी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. गौरव चतुर्वैदी हे अनिल देशमुखांचे जावई आहे. ईडी(ED), सीबीआयकडून(CBI) त्यांना ताब्यात घेतलं असावं अशी शक्यता आहे. परंतु कुठलीही माहिती न देता अशाप्रकारे कारवाई करणं योग्य आहे का? असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. जर ईडी, सीबीआयनं ताब्यात घेतलं असेल तर आम्ही त्यावर कायदेशीर उत्तर देऊ असं अनिल देशमुख कुटुंबियांनी सांगितले आहे.   

देशमुखांना कथित क्लीन चिटदेणाऱ्या व्हायरल अहवालावरून राजकीय धुरळा

दरमहा शंभर कोटी वसुलीच्या आरोपाबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सहभाग नसल्याचा सीबीआयचे उपअधीक्षक आर. एस. गुंजाळ यांचा ६५ पानी अहवाल सध्या व्हायरल झाला आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते.  अहवालाबाबत सीबीआयने कानावर हात ठेवले असले तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला लक्ष्य करत हा कट असल्याचे उघड झाले असून आता सत्य समोर येत असल्याचा दावा केला, तर भाजप नेत्यांनी सावध पवित्रा घेत थेट समोर न येता, तपास अजून पूर्ण व्हायचा असल्याचे सांगितले. व्हायरल अहवालावर गुंजा‌ळ यांची स्वाक्षरी नाही. सीबीआयच्या प्रवक्त्याने देशमुख यांना ‘क्लीन चिट’ दिली नसल्याचे सांगत तपास सुरू असल्याचे म्हटले होते. मात्र, फुटलेला अहवाल खरा की खोटा, यावर सीबीआय संचालकांनी भाष्य केले नव्हते.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग