शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पावर माजी अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, "... तरतुदी सूक्ष्मदर्शी यंत्रानं पाहाव्या लागतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 17:53 IST

Maharashtra Budget Session : अपयशी महाविकास आघाडी सरकारचा अर्थहीन व दिशाहीन अर्थसंकल्‍प असल्‍याची माजी अर्थमंत्र्यांची टीका

ठळक मुद्देकष्टकरी, गोरगरीबांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम, मुनगंटीवार यांची टीकादिलासात्मक पॅकेज घोषित न केल्यानं राज्याची निराशा : मुनगंटीवार

 "अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पात विदर्भ, मराठवाडा, खान्‍देश या भागासाठी केलेल्‍या विकासात्‍मक तरतूदी सूक्ष्‍मदर्शी यंत्राने बघाव्‍या लागतील अशा आहेत. गेल्‍या वर्षभरात कोरोनाच्‍या प्रकोपामुळे जे संकट राज्‍याने अनुभवले त्‍यात उद्योग, सेवा, बांधकाम क्षेत्र, वस्तू निर्माण क्षेत्र, वाहतूक क्षेत्र, व्‍यापार क्षेत्र या सर्वच क्षेत्रांवर कोरोनाच्‍या संकटात प्रतिकुल परिणाम झाला. अनेक घटकांना आर्थिक विवंचनेचा फटका आजही सहन करावा लागत आहे. राज्‍यावरील ही आपत्‍ती लक्षात घेता ही सारी क्षेत्रे यामधून बाहेर पडण्‍यासाठी मोठे पॅकेज अर्थमंत्री म्‍हणून अजित पवार देतील अशी अपेक्षा राज्‍यातील जनतेला होती, पण अशा पद्धतीचे कोणतेही दिलासात्‍मक पॅकेज अर्थमंत्र्यांनी घोषित न करून राज्‍याची निराशा केली आहे," अशी प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.  "गेल्‍या ६१ वर्षात प्रथमच राज्‍याचे दरडोई उत्‍पन्‍न मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे, पण कोणतीही गरीब कल्‍याण योजना अर्थमंत्र्यांनी घोषित केली नाही. जागतिक महिला दिनी अर्थसंकल्‍प अर्थमंत्र्यांनी जाहीर केला, महिलांसाठी भरघोस तरतूद होईल अशी अपेक्षा होती. मात्र किरकोळ घोषणा करून महिलांना सुध्‍दा या सरकारने न्‍याय दिला नाही. डोंगर खणला, उंदीर निघाला या म्‍हणीच्‍या पुढे जात डोंगर खणला आणि उंदराचे चित्र निघाले अशी अवस्‍था या अर्थसंकल्‍पाची आहे," असं म्हणत मुनगंटीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. 

कष्टकरी, गोरगरीबांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम

या अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातून शक्‍तीशाली महाराष्‍ट्राच्‍या भविष्‍याचा वेध अर्थमंत्री घेतील अशी अपेक्षा होती. मात्र कोरोना काळात निर्माण झालेले प्रश्‍न सोडविण्‍याचा प्रयत्‍न सुद्धा या अर्थसंकल्पाच्या माध्‍यमातून केला गेला नाही. महाविकास आघाडी सरकारच्‍या घटक पक्षांचे शपथनामे, वचननामे यांचे प्रतिबिंब अर्थसंकल्‍पात दिसेल अशी अपेक्षा होती. मात्र राज्‍यातील कष्‍टकरी, शेतकरी, गोरगरीब जनतेच्‍या तोंडाला अर्थमंत्र्यांनी पाने पुसल्‍याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भcorona virusकोरोना वायरस बातम्या