शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Maratha Reservation: "कायदा बनल्यानंतर त्याचं श्रेय घेणारे आज म्हणतात तो फुलप्रूफ नव्हता, किती हा दुटप्पीपणा?" 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 7:21 PM

Maratha Reservation : देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर. जर कायदा फुलप्रूफ होता तर आता आम्हाला राज्यपालांना भेटायची वेळ आली नसती, असं म्हणाले होते मुख्यमंत्री.

ठळक मुद्देजर कायदा फुलप्रूफ होता तर आता आम्हाला राज्यपालांना भेटायची वेळ आली नसती, असं म्हणाले होते मुख्यमंत्री.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

सर्वोच्च न्यायालयानंमराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ठाकरे सरकारनं यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं थोड्याच वेळापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. राष्ट्रपतींना पाठवण्याचं निवेदन आम्ही राज्यपालांकडे दिलेलं आहे. या प्रश्नी आम्ही लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली. "जर कायदा फुलप्रूफ होता तर आता आम्हाला राज्यपालांना भेटायची वेळ आली नसती," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. "मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा?," असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. "मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजप सरकारच्या काळात हाच कायदा उच्च न्यायालयात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते. परंतु  नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?," असा सवालही त्यांनी केला आहे. राज्यपालांच्या भेटीनंतरकाय म्हणाले मुख्यमंत्री?

मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने संमत केला आहे, जनतेच्या भावनांचा आदर ठेवून हा निर्णय  झाला, तो न्यायालयात टिकला नसला तरी सरकार म्हणून आम्ही सर्व या समाजाच्या भावनांशी सहमत आहोत. न्यायालयाने याबाबतीत केंद्राला अधिकार आहेत असं सांगितले आहे, त्या अनुषंगाने आज आम्ही राज्यपालांना भेटलो. राज्यपालांनी देखील आमचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले असून ते केंद्राला आमच्या भावना कळवतील. लवकरच आम्ही पंतप्रधानांची वेळ घेऊन त्यांना या प्रश्नी भेटणार आहोत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही सर्वांनी समाजाच्या भावना लक्षात घेता केंद्राला याबाबत विनंती करायचे ठरविले आणि त्यानुसार आज राज्यपालांना भेटून पहिले पाऊल टाकले आहे. मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. आरक्षण प्रश्नी सरकार सोबत आहे याची समाजाला कल्पना आहे, ते सरकारच्या विरोधात नाहीत, त्यामुळे मी पूर्वी देखील मराठा समाजाला धन्यवाद दिले आहेत आणि आता आपल्या माध्यमातून परत धन्यवाद देतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshok Chavanअशोक चव्हाणMaharashtraमहाराष्ट्रbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी