ठाणे: जम्मू काश्मीरमधून रद्द करण्यात आलेल्या कलम 370 निमित्त नवी मुंबईत भाजपाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या उपस्थित होते. मात्र त्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम त्यांनी व्यासपीठ आणि खुर्च्या यांच्यामध्ये असलेल्या पायऱ्यांजवळ बसून पाहिला. ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात आज मानापमान नाट्य रंगलेले पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर माजी खासदार भाजपचे ठाणे जिल्हा प्रभारी किरीट सोमय्या यांनीही व्यासपीठावर जागा न मिळाल्याने त्यांनी थेट सभागृहातील व्हरांड्यातच बसकण मारली. सोमय्या यांनी व्यासपीठाच्या पायऱ्यांजवळ बसून संपूर्ण कार्यक्रम पाहिला.
भाजपाच्या व्यासपीठावर किरीट सोमय्यांना जागा नाही; खाली बसून पाहिला कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 21:32 IST