'पूरग्रस्तांना गरज कपडे, पाणी, खाद्यपदार्थांची'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 02:03 AM2019-08-10T02:03:02+5:302019-08-10T02:03:20+5:30

नागरिकांनी जुने नव्हे नवीन कपडे मदत म्हणून देण्याचे आवाहन

'Flood victims need clothes, water, food' | 'पूरग्रस्तांना गरज कपडे, पाणी, खाद्यपदार्थांची'

'पूरग्रस्तांना गरज कपडे, पाणी, खाद्यपदार्थांची'

googlenewsNext

पुणे : सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांना सध्या बाटलीबंद पाणी, मेणबत्ती-काडीपेटी, सुके खाद्यपदार्थ आणि कपड्यांची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी या वस्तू पुणे रल्वे स्थानकाजवळील विभागीय आयुक्त कार्यालयातील (कौन्सिल हॉल) मदत कक्षात द्याव्यात. मदत म्हणून जुने कपडे देऊ नयेत. द्यायचे असल्यास नवीन कपडेच द्यावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी केले.

या वस्तू मदत म्हणून स्वीकारणार...
बिस्कीट, न्यूडल्स, चहा पावडर, टूथपेस्ट-ब्रश, साबण, पाण्याच्या बाटल्या, मेणबत्ती, काडेपेटी, टॉर्च, ब्लँकेट, सतरंजी, टॉवेल, साडी, लहानमुलांचे कपडे, मोठ्या माणसांची कपडे आणि आंतरवस्त्र. वेदनाशामक, ताप-सर्दी-खोकला आणि व्हेपोरब ही औषधे स्वीकारले जातील. तर,रोख रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता फंडाला देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

पुणे-बेंगळुरु महामार्ग बंद असल्याने १७ ते १८ हजार वाहने रस्त्यावर अडकून पडली आहेत. रस्ते वाहतूक सुरु झाल्यानंतर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर आणि धान्याची वाहने कोल्हापूरला सोडण्यात येतील. त्यामुळे रस्ता सुरु झाल्याचे समजल्यावर वाहने रस्त्यावरआणू नयेत. अत्यावश्यक सुविधा पोचविणारी वाहने गेल्याची सूचना मिळाल्यानंतर वाहने या रस्त्यावर आणावीत.
डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे

Web Title: 'Flood victims need clothes, water, food'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.