Flood: राज्यातील महापूर ओसरू लागला; मात्र सर्प, विंचूदंशाचा वाढला धोका! कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 07:38 AM2021-07-26T07:38:15+5:302021-07-26T07:40:38+5:30

सतर्क राहण्याचे सर्पमित्रांचे आवाहन, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, पुढील काही तास तो पूर्ववत होण्याची शक्यता कमी आहे

Flood: Increased risk of snakes and scorpions after Flood How to take care? know About | Flood: राज्यातील महापूर ओसरू लागला; मात्र सर्प, विंचूदंशाचा वाढला धोका! कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या

Flood: राज्यातील महापूर ओसरू लागला; मात्र सर्प, विंचूदंशाचा वाढला धोका! कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या

Next

मुंबई : मुंबईच्या आसपासच्या परिसरासह राज्यातील बहुतांश ठिकाणी विशेषत: कोकण (मुंबईसह) आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. आता येथील पूर ओसरू लागले असले तरीदेखील सर्पदंशाच्या घटनांपासून नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षा बाळगावी, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

पावसामुळे रानामाळातील, डोंगरपायथ्यानजीकची सर्पांची वास्तव्याची ठिकाणे म्हणजे  बिळे, सर्पांची वारुळे, विटा-दगड-मातीचे ढिगारे, दगड-गोट्यांच्या चिरा, भिंतीमधील भेगांमध्ये सर्प, विंचू पाण्याबरोबर प्रवाहित होत पडवी, माजघर किंवा काही वेळेस स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आणि भक्ष्याच्या शोधात घरात शिरतात. अशाप्रसंगी सर्पदंश, विंचूदंश टाळण्यासाठी सुरक्षेची उपाययोजना करण्यात यावी, असे सर्पमित्र भरत जोशी यांनी सांगितले. 

हे करा...

  • अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, पुढील काही तास तो पूर्ववत होण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी सोबत एक काठी आणि टॉर्च बाळगावी.
  • नेहमी चप्पल, सँडल, बूट आणि गमबुटाचा वापर करावा.
  • चटई, सतरंजी, ब्लँकेट झाडून-झटकून घ्यावे.
  • पाण्यातून, चिखलातून वावरताना हातात नेहमी काठी बाळगावी.

 

सर्पदंश झाला तर...

  • सर्पदंश झाला तर प्रथमोपचार देत संबंधिताला सरकारी ग्रामीण रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करावे.
  • डाव्या हाताला सर्पदंश किंवा विंचूदंश झाल्यास हाताच्या कोपरापासून खालच्या दिशेने क्रेप बँडेज बांधा.
  • सर्पदंशावर पाण्याची संततधार सोडा. हाताच्या कोपरापासून खालच्या दिशेने हाताने दाबत राहा. म्हणजे रक्ताबरोबर ५० टक्के विष आणि विषारी रक्त सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडेल.

 

Web Title: Flood: Increased risk of snakes and scorpions after Flood How to take care? know About

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.