शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट सावकारी कर्जमाफी

By admin | Updated: March 14, 2015 05:05 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील खासगी सावकारांचे कर्ज सरसकटपणे राज्य शासन परतफेड करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील खासगी सावकारांचे कर्ज सरसकटपणे राज्य शासन परतफेड करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. गुरुवारी विधानसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी सावकारी कर्जमाफीवरून सरकारवर जोरदार हल्ला चढविला होता. हिवाळी अधिवेशनात सरकारने सावकारी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात याबाबत कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळबाधितांचे खासगी सावकारांकडील कर्ज राज्य सरकारने भागवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा राज्यातील २३८११ गावांत टंचाईसदृशस्थिती आहे. या सर्व गावातील शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत खासगी सावकारांकडील सरसकट कर्जाची परतफेड सरकार करणार आहे. याबाबत गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे कर्ज असले तरी त्याची परतफेड शासन करणार आहे. राज्यातील तब्बल २० हजार गावांना सातत्याने टंचाईची झळ सोसावी लागते. ही दुष्काळीस्थिती तसेच उत्पादकतेतील घट शेतकरी आत्महत्यांमागील प्रमुख कारण आहे. यावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या जात आहेत. या योजनेत आतापर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातून राज्यातील १४ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)