शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे, तर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 15:15 IST

यावेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले.

मुंबई/पुणे - भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहन केले. यावेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केल्यानंतर ध्वजास सलामी देणारे पोलीस पथक, ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस संचलन मैदानात शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक एस चोक्कलिंगम, सहकार आयुक्त अनिल कवडे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तसेच पोलीस पथकाने ध्वजास सलामी दिली. 

यावेळी वीरमाता व वीरपत्नींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या वतीने पोलीस विभागाला देण्यात येणारी वाहनेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस विभागाला सुपूर्द करण्यात आली.

नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण -प्रजासत्ताक दिनानिमित्त आज नाशिकमध्ये मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाने शानदार संचलन केले. 

पालकमंत्री भुजबळ यांनी कोरोनाशी लढा देऊन स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्व यंत्रणांचे अभिनंदन करून विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला. या वेळी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह अन्य आधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यवतमाळमधील दिग्रस येथील BSNL कार्यालयाला ध्वजारोहणाचा विसर -  मंगळवारी देशभर भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) कार्यालयाला या ध्वजारोहणाचा जणू विसर पडला. आज या कार्यालयात ध्वजारोहण झालेच नाही. विशेष असे, हे कार्यालय आज उघडलेच गेले नाही. यामुळे दिग्रसकर नागरिकांत या कार्यालयाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारMumbaiमुंबईPuneपुणेNashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळ