शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशासाठी सहा वर्षांची अट निश्चित

By admin | Updated: November 4, 2014 02:38 IST

पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशाचे वय किती असावे, याबाबतही विस्तृत सूचना केली आहे.

पुणे : पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्गातील प्रवेशाचे वय निश्चित करण्यासाठी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीचा अहवाल शासनास सादर केला असून, सहा वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीत प्रवेश द्यावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशाचे वय किती असावे, याबाबतही विस्तृत सूचना केली आहे.अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड व त्रिपुरा या राज्यांमध्ये पहिलीच्या प्रवेशाचे वय सहा वर्षे आहे. उर्वरित राज्यांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी वयाची अट पाच वर्षे आहे. परंतु, महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक वर्ग व प्राथमिक वयाबाबत कोणतीही विहीत वयोमर्यादा अथवा निकष अस्तित्वात नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वयाची निश्चिती करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती.राज्यात राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा, सीबीएसई, आयसीएसई, आयबी अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे. परंतु, ३१ जुलै रोजी संबंधित विद्यार्थ्याचे वय किती आहे, हे विचारात घेऊन शाळांनी प्रवेश द्यावा, असे या अहवालात म्हटले आहे. राज्यामध्ये पहिलीच्या प्रवेशाचे वय एकदम ६ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक केल्यास अनेक शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात. परिणामी पटसंख्येअभावी शिक्षक अतिरिक्त होतील. त्यामुळे एकदम प्रवेशाची वयोमर्यादा न वाढविता टप्प्याटप्प्याने दोन वर्षांमध्ये ही वयोमर्यादा वाढविली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१५-१६मध्ये ५ वर्षे व ६ महिने पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. तर २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून ६ वर्षे पूर्ण झालेल्यांना प्रवेश दिला जावा, असे अहवालात स्पष्ट केले. (प्रतिनिधी)