शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नामदेव भोईटे खून प्रकरणातील पाच जणांना 24 तासांत अटक

By admin | Updated: April 18, 2017 22:50 IST

पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भोईटे (वय ३६) यांच्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पाच जणांना चोवीस तासांत अटक

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 18 - पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भोईटे (वय ३६) यांच्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पाच जणांना चोवीस तासांत अटक केली. भोईटे यांचा मित्र राजेंद्र भिंगे व त्याच्या चार साथीदारांनी उसने घेतलेले २० लाख परत देत नसल्याने भोईटे यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. खुनासाठी आरोपींनी वापरलेली मोटार पोलिसांनी जप्त केली.
राजेंद्र लक्ष्मण भिंगे (वय ३८, रा. विमाननगर, पंढरपूर), गजेंद्र  दिगंबर पवार (३३), रवींद्र हरिभाऊ गुजर (३७, सर्व रा. पंढरपूर), सचिन नारायण मोहिते (२४, रा. सोलापूर), रावसाहेब संभाजी लोखंडे (२८, रा. पंढरपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सोमवारी रात्री पंढरपूर रस्त्यावर खरशिंग फाट्याजवळ नामदेव भोईटे यांच्या खुनाच्या घटनेनंतर मोटारचालक प्रसाद निर्मल याने, मोटारीतून आलेल्या दोघांनी कोयत्याने हल्ला करून खून केल्याची फिर्याद  दिली होती. मात्र घटनास्थळी रक्ताने माखलेले तीन कोयते पोलिसांना सापडल्याने दोघांपेक्षा अधिक लोकांनी भोईटे यांचा खून केल्याचा पोलिसांचा संशय होता. पोलिसांनी राजेंद्र भिंगे याचा शोध सुरू केल्यानंतर त्याचे मोबाईल लोकेशन कोल्हापूर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस पथकाने कोल्हापुरात जाऊन प्रमुख संशयित राजेंद्र भिंगे आणि त्याच्या चार साथीदारांना ताब्यात घेतले. खुनासाठी वापरण्यात आलेली मोटार (एमएच १२ जी झेड २७७५) जप्त करण्यात आली.
मृत भोईटे हे राजेंद्र भिंगे याचे २० लाख रुपये परत देत नव्हते. या रागातून भिंगे याने साथीदारांसोबत भोईटे यांचा काटा काढल्याची कबुली दिली आहे. खूनप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खुनासाठी तिघांनी कोयता व एकाने मोठा चाकू वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तीन कोयत्यांसह चाकूही जप्त केला आहे. 
 
असा झाला खून-
नामदेव भोईटे, राजू भिंगे व नाना झाडबुके सोमवारी मिरजेत भारती रुग्णालयात उपचार घेणाºया भ्ािंगे याच्या नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी भाड्याच्या मोटारीतून (क्र. एमएच-४५-ए ३५५४) आले होते. सायंकाळी सात वाजता तिघेजण पंढरपूरला परत निघाले. ते खरशिंग फाट्यावर गेले असता, भिंगे याने लघुशंकेचा बहाणा करीत तेथे मोटार थांबविली. मोटार थांबताच त्यांच्या मागून मोटारीतूनच आलेल्यांनी नामदेव भोईटे यांना मोटारीतून बाहेर ओढून काढून त्यांच्या डोक्यावर चाकू व कोयत्याने सपासप ३५ वार केले. कोयत्यांच्या वारामुळे भोईटे जागीच कोसळले. हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणारा मोटारचालक प्रसाद निर्मल यालाही हल्लेखोरांनी मारहाण केल्याने, तो जीव वाचविण्यासाठी पळून जाऊन लपून बसला. भोईटे यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर हल्लेखोर खुनासाठी वापरलेले दोन कोयते तेथेच टाकून मोटारीतून पसार झाले. मोटारचालक प्रसाद निर्मल याने मोबाईलवरून पंढरपुरात गाडी मालकास या घटनेबाबत कळविल्याने, खुनाबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक राजू मोरे, उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी भोईटे यांचा मृतदेह, लपून बसलेला चालक प्रसाद निर्मल, मोटार व खुनासाठी वापरलेले दोन नवीन कोयते ताब्यात घेतले. पळून गेलेल्या नाना झाडबुके यास पंढरपूर येथून मंगळवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले.
कवटी फुटून तीन बोटे तुटली-
कोयत्यांच्या हल्ल्यात भोईटे यांच्या डोक्याची कवटी फुटून, उजव्या हाताची तीन बोटे तुटली होती.
भोईटे समर्थकांची गर्दी-
पंढरपूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केलेले नामदेव भोईटे यांच्या खुनाचे वृत्त समजताच सोमवारी रात्री मिरज शासकीय रुग्णालयात भोईटे समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. हल्लेखोरांनी खुनासाठी वापरलेले तीन कोयते पोलिसांनी जप्त केले. 
मटका आणि खासगी सावकारी-
नामदेव भोईटे यांचा पंढरपुरात मटका व खासगी सावकारीचा व्यवसाय आहे. राजू भिंगे त्यांना व्यवसायात मदत करीत होता. भोईटे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने भिंगे त्यांच्यावर चिडून होता. मिरजेला येतानाही मोटारीत या दोघांत पैशाबाबत चर्चा झाली होती. पैसे देत नसल्याच्या कारणावरुन भिंगे याने कट रचून भोईटे यांचा खून केला. भोईटे यांच्यावर हल्ला होत असताना हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणारा मोटारचालक प्रसाद निर्मल यास भिंगे याने, ‘गप्प बस, नाही तर तुलाही मारीन’, अशी धमकी दिली होती. भोईटे पंढरपूरचे आ. भारत भालके यांचे कट्टर समर्थक होते.