शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्रात प्रथमच नाशिकमध्ये एटीएमच्या माध्यमातून मिळणार दूध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 4:34 PM

पैसे आणि अगदी पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे. सिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले असून, नाशिक शहरात कॉलेज रोडवर बॉईज टाऊन स्कूलसमोर हे पहिले एटीएम सुरू होणार आहे.

नाशिक- पैसे आणि अगदी पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे. सिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले असून, नाशिक शहरात कॉलेज रोडवर बॉईज टाऊन स्कूलसमोर हे पहिले एटीएम सुरू होणार आहे.नाशिक तालुक्यातील सिन्नर तालुका दूध उत्पादक संघ हा प्रगत असून, नाशिकमधील लष्करी लावणीला दूध पुरवठा केला जातो, त्यांच्या वतीने राज्यातील पहिलं एनी टाईम मिल्क ही संकल्पना अमलात आली आहे. या वातानुकूलित एटीएममध्ये ग्राहकाच्या मागणीनुसार कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर 10 रुपयांपासून पाच-दहा लिटर दूध मिळू शकेल. विशेष म्हणजे याच ठिकाणी दूध तपासून त्यातील फॅट्स आणि अन्य घटक मोफत तापाणीची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे, अशी माहिती दूध संघाचे प्रमुख आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली.या ठिकाणी सायवाल गायीचे दूध देखील उपलब्ध असून,  80 रुपयाने ते देण्यात येणार आहे. शेतकऱ्याच्या गोठ्यातील थेट फ्रेश म्हणजे प्रक्रिया न करता थेट दूध देण्याची व्यवस्था आहे. ज्या ग्राहकांना थेट गोठे बघायचे त्यांना ते देखील दाखविले जाणार आहे. या एटीएम मशीनसाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च आला आहे. शेतकऱ्यांकडील दूध कोणत्याही भेसळीशीवाय ग्राहकांना मिळावे, यासाठी हा उपक्रम असून सिन्नर तालुका दूध उत्पादक संघ आता थेट मार्केटिंगमध्ये उतरला आहे.नाशिक शहरातील या पहिल्या एटीएमनंतर मुंबईसह 50 एटीएम सुरू करण्याचा दूध संघाचा मानस असल्याचे कोकाटे यांनी सांगितलं. या प्रकल्पासाठी शेअर देखील संघ सुरू करीत असून, 5 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे, शेअर धारकांना स्वस्तात दूध तसेच लाभांश देखील देण्यात येणार आहे. संघ दूध विक्रीबरोबरच दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाई देखील तयार करणार असून, सिन्नर-घोटी मार्गावर 10 एकर जागेत काम सुरू आहे. मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Nashikनाशिकatmएटीएम