"आधी पक्ष फोडले, आता घरे फोडतील...", सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 08:23 IST2024-08-18T08:23:03+5:302024-08-18T08:23:18+5:30

शरद पवार यांनी स्वत: पक्ष काढला. मात्र अदृश्य शक्ती असलेल्या भाजपने पक्ष, चिन्ह सारेच हिसकावले. उद्या तुमची घरं फोडतील, तुम्हाला लुबाडतील, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली.

"First they broke parties, now they will break houses...", Supriya Sule's criticism | "आधी पक्ष फोडले, आता घरे फोडतील...", सुप्रिया सुळेंची टीका

"आधी पक्ष फोडले, आता घरे फोडतील...", सुप्रिया सुळेंची टीका

जळगाव : लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी यांना लाडक्या बहिणी, भाऊ व शेतकरी आठवले नाहीत. तेव्हा फक्त पक्ष फोडा, घरे फोडा हेच उद्योग केले. उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी त्यांचा पक्ष मुलाकडे सोपविला.

शरद पवार यांनी स्वत: पक्ष काढला. मात्र अदृश्य शक्ती असलेल्या भाजपने पक्ष, चिन्ह सारेच हिसकावले. उद्या तुमची घरं फोडतील, तुम्हाला लुबाडतील, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यात त्या बोलत होत्या. 

दडपशाही हद्दपार करा
लाडक्या बहिणीवरून सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. कष्टकऱ्यांना मदत केली तर ती सेवा असायला हवी, मात्र हे सरकार बहिणींना दीड हजार रुपये देऊन व्यवहार करीत आहे. 
कार्यक्रमाला आले नाही तर सर्व योजना बंद करू, पैसे मिळणार नाहीत अशा धमक्या देणाऱ्या दडपशाही सरकार हद्दपार करा, असे म्हणाल्या.

Web Title: "First they broke parties, now they will break houses...", Supriya Sule's criticism