शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

डीएमआयसीअंतर्गत पहिली गुंतवणूक औरंगाबादेत- संजय सेठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 20:11 IST

आॅटो क्षेत्रात महागड्या बाइक्सची निर्मिती करणा-या ‘ह्युसंग’ कंपनीची राज्याला भेट मिळाली आहे. डीएमआयसीअंतर्गत देशातील पहिली गुंतवणूक यानिमित्ताने औरंगाबादेत येत असल्याचे एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत अनौपचारिक चर्चेदरम्यान सांगितले.

ठळक मुद्देआॅटो क्षेत्रात महागड्या बाइक्सची निर्मिती करणा-या ‘ह्युसंग’ कंपनीची राज्याला भेट मिळाली आहे. डीएमआयसीअंतर्गत देशातील पहिली गुंतवणूक यानिमित्ताने औरंगाबादेत येत असल्याचे एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत अनौपचारिक चर्चेदरम्यान सांगितले.ह्युसंग हा विविध उत्पादनांची निर्मिती करणारा कोरियातील मोठा समूह आहे. कंपनी औरंगाबादेतील शेंद्रा एमआयडीसीत ‘स्पान्डेक्स’ हे सुटे भाग तयार करणार आहे. हे मुळात रबराचे सुटे भाग असतात. त्यांचा उपयोग अनेक ठिकाणी होतो.

मुंबई : आॅटो क्षेत्रात महागड्या बाइक्सची निर्मिती करणा-या ‘ह्युसंग’ कंपनीची राज्याला भेट मिळाली आहे. डीएमआयसीअंतर्गत देशातील पहिली गुंतवणूक यानिमित्ताने औरंगाबादेत येत असल्याचे एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत अनौपचारिक चर्चेदरम्यान सांगितले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्वर्जन्स’ या गुंतवणूक परिषदेच्या पार्श्वभूमीवर सेठी यांनी ‘लोकमत’च्या वरळी येथील कॉर्पोरेट कार्यालयाला भेट दिली.ह्युसंग हा विविध उत्पादनांची निर्मिती करणारा कोरियातील मोठा समूह आहे. कंपनी औरंगाबादेतील शेंद्रा एमआयडीसीत ‘स्पान्डेक्स’ हे सुटे भाग तयार करणार आहे. हे मुळात रबराचे सुटे भाग असतात. त्यांचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. मात्र प्रामुख्याने आॅटोमोबाइलमध्ये उष्णतारोधक म्हणून हा भाग वापरला जातो. त्याची निर्मिती कंपनी शेंद्रा एमआयडीसीत करणार आहे. मुख्य म्हणजे, ही गुंतवणूक दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा (डीएमआयसी) भाग असून या कॉरिडॉरमधील ही देशातील पहिली गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीसाठी कंपनीने पाच टक्के रक्कमही जमा केली आहे, असे सेठी यांनी सांगितले.हे तर ‘मेक विथ महाराष्ट्र’‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हा मेक इन इंडियाचाच एक भाग आहे. यामध्ये काही लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार होणार आहेत. मात्र या करारापेक्षाही यानिमित्ताने तयार होणारे वातावरण महाराष्ट्राला जागतिक पातळीवर नेण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्राने विविध धोरणे आणली आहेत. या धोरणांच्या निमित्ताने येथे असलेली औद्योगिक वातावरण जागतिक दर्जाच्या कंपन्यांसमोर सादर करता येणार आहेत. याचा फायदा येत्या काळात होईल. त्यातून एकप्रकारे ‘मेक विथ महाराष्ट्र’ संकल्पना उभी होईल, असे ते म्हणाले.औद्योगिक धोरणाची सुरुवात विलंबानेराज्य सरकारने २०१३ च्याच औद्योगिक धोरणाला मुदतवाढ दिली. त्याऐवजी आधीच जीएसटीला अनुसरून नवीन धोरण का तयार केले नाही? याबाबत सेठी यांनी मुळात जुन्या धोरणाची सुरूवात विलंबाने झाल्याचे मत मांडले. जुने धोरण २०१३ चे असले तरी त्याची अंमलबजावणी या सरकारने २०१४ मध्ये केली. त्यामुळे त्यादृष्टीने या धोरणासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसीत भूखंडांची प्रतिक्षा यादी मोठी असल्याबद्दल त्यांनी सांगितले की, यासाठीच आता भूखंड वाटपाची प्रणाली बदलण्यात आली आहे. लिलावाद्वारे उद्योगांना जमीन दिली जाते. कमी उद्योग असलेल्या वसहतीत जमीन उपलब्ध आहेच.प्रसारमाध्यमांच्या चर्चेत ‘लोकमत’‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. त्यामध्येच २० फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजता प्रसारमाध्यमांसंबंधी ‘माहिती व मनोरंजनाचे भविष्य’ या विषयावर चर्चासत्र होत आहे. ‘लोकमत’चे संपादकीय संचालक व सह व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा त्यामध्ये वक्ते असतील, असे सेठी यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Mumbaiमुंबई