शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

'अ‍ॅडॉल्फ हिटलर' वर मराठीत पहिली कल्पनाप्रधान कादंबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 06:00 IST

क्रूरपणा आणि ज्यूंच्या कत्तलीसाठी कुप्रसिद्ध असलेला नेता अशी अ‍ॅडॉल्फ हिटलर याची जगभरात ओळख.

ठळक मुद्देऐतिहासिक काल्पनिकतेवर '१९७० : एडॉल्फ हिटलरचे पुनरागमन' ही मराठी काल्पनिक कादंबरीइंग्रजीतील अनुवादित पुस्तकाचे 23 देशांमध्ये प्रकाशन       या कादंबरीवर चित्रपट निर्मित व्हावा अशी इच्छा

- नम्रता फडणीस- 

पुणे : जर्मनीचा हुकुमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या राजकीय प्रवासावर भाष्य करणा-या किंवा त्याच्या क्रूरपणाचे दर्शन घडविणा-या आजवर अनेक कादंब-या देशविदेशात प्रसिद्ध झाल्या.  मात्र हिटरला केंद्रस्थानी ठेवून  ‘इतिहासात असे झाले असते तर’ या कल्पनेतून  पहिली मराठी कल्पनाप्रधान कादंबरी साकार झाली आहे. विशेष म्हणजे, ही कादंबरी मूळ मराठीतील. मात्र मराठीमध्ये त्याचे अद्यापही प्रकाशन झालेले नाही.कादंबरीच्या मूळ संहितेवर इंग्रजीेमध्ये '1970 : Return Of Adolf Hitler’ या शीर्षकांतर्गत हे  पुस्तक अनुवादित होऊन तब्बल 23 देशांमध्ये ते प्रकाशित होण्याचा मान चिन्मय मोघे या तरूण लेखकाला मिळाला आहे.  वयाच्या 18 व्या वर्षी इंग्रजीत पुस्तक अनुवादित होणारा तो पहिला मराठी कादंबरीकार ठरला आहे.     क्रूरपणा आणि ज्यूंच्या कत्तलीसाठी कुप्रसिद्ध असलेला नेता अशी अ‍ॅडॉल्फ हिटलर याची जगभरात ओळख. परंतु  या नेत्याचा चरित्रात्मक पटच आजवर मांडला गेला आहे. तरूण कादंबरीकार चिन्मय मोघे याने  ‘जरा हटके’ अशा कल्पनाविलासातून हिटलरला वाचकांसमोर आणला  आहे. हिटलरचे प्रेत मित्रराष्ट्रांना सापडलेच नव्हते! मग हिटलर कोठे पळाला असावा? त्याने परत सत्ता बळकवण्याचा प्रयत्न केला तर? हिटलरने इतर देशांमध्ये विविध राजकीय पक्षात त्याचेच गुप्तहेर पाठवले तर?.. आणि १९७०सालापर्यंत हाहा म्हणता हिटलर परत आलाही!! मग काय घडले? या सर्व कल्पनांचा विस्तार म्हणजे ही कादंबरी आहे. 

    या कादंबरीविषयी  ‘लोकमत’ शी बोलताना चिन्मय मोघे म्हणाला, 1945 ला हिटलर गेला असे जर्मनीने घोषित केले. 40 वर्षांनी अभ्यासात उघड झाले की हिटलरचे प्रेत सापडले नाही. जे सापडले ते त्याच्या तीन डुप्लीकेटपैकी एकाचे आहे. मग तो पळून गेला तर कुठे गेला? त्याने काय केले. तो परत आला तर काय घडेल? अशा ऐतिहासिक काल्पनिकतेवर '१९७० : एडॉल्फ हिटलरचे पुनरागमन' ही पहिल्यांदा मराठीमध्ये काल्पनिक कादंबरी लिहिली. या कादंबरीची मूळ संहिता तयार आहे. पण प्रकाशित करण्यास काही अडचणी आल्या. ऐतिहासिक कल्पनाविस्तार हा आपल्याकडे चालणारा विषय नाही. हिटलरच्या चरित्रावर पुस्तक असेल तर आपण करू असे काही प्रकाशकांकडून सांगण्यात आले. हिटलरचे चरित्र चालेल पण कल्पनाविस्तारावर आधारित पुस्तक प्रकाशित करण्यात कुणीही फारसा रस  दाखविला नाही. यातच मराठी पुस्तक प्रकाशित व्हायला वर्ष लागते. मात्र इंग्रजी भाषेत दोन महिन्यात पुस्तक अनुवादित झाले आणि त्याचे प्रकाशन होऊन  विक्रीला देखील सुरूवात झाली. आपल्याकडे प्रकाशनात गतिमानता नाही.  आपल्याकडे पारंपारिक विषयांवर कादंबरी स्वीकारली जाते. मात्र जागतिक विषयांवरचे जे ट्रेंड आहेत. ते सहजासहजी आत्मसात केले जात नाहीत. मराठीत वाचक अजून तयार होतो आहे, अशी प्रकाशकांची मानसिकता आहे. त्यामुळे कुणी प्रकाशकांनी हे पुस्तक प्रकाशित केले नाही तरी मी स्वत: मराठीमध्ये ही कादंबरी प्रकाशित करेन.     या इंग्रजी अनुवादित पुस्तकाची पहिली प्रत नेदरलँंडमध्ये विकली गेली आणि मग इंग्लंड, फ्रान्स मध्येही चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास २३ देशांमध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या कादंबरीवर चित्रपट निर्मित व्हावा अशी इच्छा असल्याचे त्याने सांगितले. ------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य