शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

जाती नष्ट करा, आम्ही आरक्षण मागणार नाही- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 10:14 PM

शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या मुलाखतीत आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे, असे मत मांडले होते.

सोलापूर: आधी जाती नष्ट करा, मग आम्ही आरक्षण मागणार नाही, असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आर्थिक निकषांवरील आरक्षणाच्या प्रस्तावाला विरोध केला. ते शनिवारी सोलापूर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आर्थिक निकषावरील आरक्षणाला विरोध केला. रिपब्लिकन ऐक्यासाठी मराठा समाजात फूट पाडा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि हमीभावाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी केली. याशिवाय, सरकारने इंदू मीलचा प्रश्नही मार्गी लावावा, असेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या मुलाखतीत आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे, असे मत मांडले होते. त्यानंतर लगेचच आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. या देशात जाती आहेत, तोपर्यंत जातीवर आधारित आरक्षण राहणार. दलित, आदिवासी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आधी जातिव्यवस्था नष्ट करा, मग जातीआधारित आरक्षणाविरुद्ध बोला. सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास सर्व ताकदीनिशी तो हाणून पाडू. जाती नष्ट  झाल्याशिवाय जातीआधारित आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा; लिंगायत; ब्राह्मण आदी सवर्ण समाजातील आर्थिक दुर्बलांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवून ७५ टक्के करण्यात यावी. तसे झाल्यास सर्वाना आरक्षणाचा लाभ मिळून आरक्षणावरून होणारी भांडणे मिटतील असा दावा रामदास आठवले यांनी केला होता. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेreservationआरक्षण