शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी ११ हजार लोकांनी घेतले शिवभोजन; राज्यात १२२ केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 02:52 IST

खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट, मेसच्या माध्यमातून शिवभोजन योजना राबविण्यात येत आहे.

मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात रविवारी शिवभोजन योजनेची सुरुवात करण्यात आली. एकूण १२२ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी राज्यातील ११ हजार ४१७ लोकांनी या योजनेंतर्गत जेवण केल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.भुजबळ म्हणाले, राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून ‘शिवभोजन’ या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांच्या माध्यमातून गरिबांना १० रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवभोजन योजनेची राज्यात काटेकोरअंमलबजावणी व्हावी, यासाठी विभागाला सूचना देण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.अकोला जिल्ह्यात २, अमरावतीत ३, बुलडाणा ३, वाशिम २, औरंगाबाद ४, बीड १, हिंगोली १, जालना २, लातूर १, नांदेड ४, उस्मानाबाद ३, परभणी २, पालघर ३, रायगड ४, रत्नागिरी ३, सिंधुदुर्ग २, परळ ३, अंधेरी ३, वडाळा २, ठाणे ७, कांदिवली २, भंडारा २, चंद्रपूर ३, गडचिरोली १, गोंदिया २, नागपूर ७, वर्धा २, अहमदनगर ५, धुळे ४, जळगाव ७, नंदूरबार २, नाशिक ४, कोल्हापूर ४, पुणे १०, सांगली ३, सातारा ४, सोलापूर ५ अशी केंद्रे सुरू झाली आहेत.१२ ते २ या वेळेत भोजन उपलब्धखानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट, मेसच्या माध्यमातून शिवभोजन योजना राबविण्यात येत आहे. या केंद्रांतून योजनेंतर्गत दुपारी १२ ते २ या वेळेत भोजन उपलब्ध करून दिले जात आहे. लाभार्थींच्या १० रुपयांच्या रकमेव्यतिरिक्तची उर्वरित रक्कम अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून अनुदान म्हणून केंद्र चालकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.मुंबई, ठाण्यात एकूण १७ केंद्रेराज्यात एकूण १३९ शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी १२२ केंद्र कार्यरत झाली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तीन केंद्रांना मान्यता देण्यात आली असली तरी अद्याप एकही केंद्र सुरू झालेले नाही. मुंबई आणि ठाण्यात एकूण १७ केंद्र मंजूर असून ही सर्व केंद्र सुरू झाली आहेत. पुण्यात सर्वाधिक ११ केंद्र मंजूर असून त्यापैकी दहा केंद्र कार्यरत झाली आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र