शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

इथेनॉलवरील पहिली बस नागपुरात धावणार

By admin | Published: July 29, 2014 12:57 AM

उपराजधानीच्या रस्त्यांवर लवकरच संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी ‘ग्रीन बस’ धावणार आहे. १०० टक्के इथेनॉलवर चालणारी सार्वजनिक परिवहन सेवेतील देशातील ही पहिली बस ठरणार आहे.

ब्राझीलची कंपनी देणार : गडकरींचा पुढाकार नागपूर : उपराजधानीच्या रस्त्यांवर लवकरच संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी ‘ग्रीन बस’ धावणार आहे. १०० टक्के इथेनॉलवर चालणारी सार्वजनिक परिवहन सेवेतील देशातील ही पहिली बस ठरणार आहे. केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकारातून ही बस सर्वप्रथम सुरू करण्याचा मान नागपूर महापालिकेला मिळणार आहे. यासाठी ९ आॅगस्ट रोजीचा मुहूर्त काढण्याची तयारी सुरू आहे. नागपूर महापालिका शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी स्टार बस चालविते. त्यासाठी वंश निमय कंपनीला कंत्राट देण्यात आला आहे. या सर्व बस डिझेलवर चालतात. डिझेलचे दर वाढले की तिकीट वाढते व प्रवाशांवर भुर्दंड पडतो. डिझेल ६५ रुपये प्रति लिटर असून इथेनॉल ४५ रुपये लिटर पडते. त्यामुळे इंधनावर होणाऱ्या खर्चातही मोठी बचत होऊ शकते. याची दखल घेत भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ब्राझीलच्या ‘कॅनोय’ या कंपनीशी चर्चा केली. संबंधित कंपनीने संपूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या चार ‘ग्रीन बस’ स्वखर्चाने देण्याची तयारी दर्शविली आहे. यातील पहिली बस नागपूर महापालिकेला मिळत आहे. इथेनॉलवर चालणारी देशातील पहिली ग्रीन बस चालविण्याचा प्रयोग नागपुरात होणार आहे. सोमवारी संबंंिधत बसचे पार्ट कंटेनरने नागपुरात आणले होते. संबंधित कंपनीचे काही अधिकारीही नागपुरात दाखल झाले. मंगळवारपासून बसची जोडणी सुरू केली जाईल. ९ आॅगस्ट रोजी गडकरी या ‘ग्रीन बस’ला हिरवी झेंडी दाखवतील, अशी शक्यता आहे. मात्र, संबंधित बसची कागदपत्रे पूर्णपणे तयार व्हायची आहेत. बस तयार झाल्यावर पुण्यातील एक कंपनी येऊन तिची तपासणी करेल. याचा अहवाल राज्य शासनाला पाठविला जाईल. त्यानंतर ही बस सुरू होईल.तीन महिने रिझल्ट पाहू - महापौरनितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून १०० टक्के इथेनॉलवर बस चालविण्याचा पहिला प्रयोग नागपूर महापालिका करणार आहे. तीन महिने या बसचा रिझल्ट पाहिला जाईल. हा प्रयोग यशस्वी ठरला तर हळूहळू उर्वरित बसही इथेनॉलवर चालविल्या जातील. यातून महापालिकेची आर्थिक बचत होईल व नागपूर प्रवाशांनाही स्वस्तात प्रवास करायला मिळेल.