शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावमध्ये काँग्रेस आमदाराच्या काकांवर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 08:34 IST

रात्री उशिरा त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

मालेगाव (नाशिक) : शहरातील उद्याने शिवारातील विद्युत उपकेंद्राजवळ रात्री दीडच्या सुमारास माजी स्थायी समिती सभापती शेख खलील शेख शफी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला गोळी चाटून गेल्याने जीव वाचला. रात्री उशिरा त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

घटनेची माहिती कळताच काँग्रेस समर्थकांनी रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पोलीस उप अधिक्षक रत्नाकर नवले यांनी पहाटे चार वाजता घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.

खलिल शेख हे मनपाचे विद्यमान महापौर रशीद शेख यांचे धाकटे बंधू तर मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख यांचे काका आहेत. याप्रकरणी रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते. 

मालेगाव शहरात गुन्हेगारीने डोकेवर काढले असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. 28 सप्टेंबर रोजी कुख्यात गुंड देसीदादा याची हत्या करण्यात आली होती. मागील 10 दिवसांत पोलिसांनी तीन वेळा शहरात धारदार शस्त्रास्त्रे हस्तगत केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा कुठलाही वचक शिल्लक नसल्याचे घडलेल्या घटनांवरून अधोरेखित होत आहे. 

टॅग्स :MalegaonमालेगांवNashikनाशिकMLAआमदारfireआग