लोअर परेलमध्ये इमारतीला आग
By Admin | Updated: November 2, 2016 01:51 IST2016-11-02T01:51:35+5:302016-11-02T01:51:35+5:30
लोअर परेल येथील मॅरेथॉन इमारतीला रात्री अकराच्या सुमारास आग लागली.

लोअर परेलमध्ये इमारतीला आग
मुंबई : लोअर परेल येथील मॅरेथॉन इमारतीला रात्री अकराच्या सुमारास आग लागली. १८ मजली कार्यालयीन इमारत असलेल्या या इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. आगीची माहिती समजताच आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ६ पाण्याचे टँकर घटनास्थळी असल्याची माहिती अग्निशमन दलाने मिळाली. आगीचे नेमके कारण कळले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून दिली असून जीवितहानी विषयी अद्याप कोणतीच माहिती नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. (प्रतिनिधी)