शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

माहिती खात्यात आर्थिक घोटाळा! काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 05:44 IST

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम १ आॅक्टोबर २०१७ रोजी शेवटचा प्रसारित झाला. त्यानंतर तो कार्यक्रम झालेला नसताना या कार्यक्रमाच्या बिलापोटी दर महिन्याला १९ लाख ७० हजार रुपये याप्रमाणे दहा महिन्यांचे २ कोटी ३६ लाख एफरवेसंट फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देऊन माहिती व जनसंपर्क खात्याने मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

मुंबई : ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम १ आॅक्टोबर २०१७ रोजी शेवटचा प्रसारित झाला. त्यानंतर तो कार्यक्रम झालेला नसताना या कार्यक्रमाच्या बिलापोटी दर महिन्याला १९ लाख ७० हजार रुपये याप्रमाणे दहा महिन्यांचे २ कोटी ३६ लाख एफरवेसंट फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देऊन माहिती व जनसंपर्क खात्याने मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.माहिती खात्याने ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम गाजावाजा करत सुरू केला. मात्र कार्यक्रमाचे चित्रीकरण, प्रसारणाचे कंत्राट अनुभव नसलेल्या ‘एफरवेसंट फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नवख्या कंपनीला दिले. हे काम दिले गेले त्याच्या फक्त ३ महिने आधी ही कंपनी स्थापन झाली आहे. त्कोणत्या निकषांवर या कंपनीची निवड केली? कार्यक्रम पाहिल्यावर निर्मितीवर वारेमाप उधळपट्टी केल्याचे दिसते. माहिती जनसंपर्क विभागाकडे अद्ययावत सुविधा, सक्षम मनुष्यबळ असताना नवख्या खासगी कंपनीला कंत्राट का दिले? कंपनीवर सरकारचे एवढे प्रेम का, असे प्रश्न सावंत यांनी केले.माहिती खात्याचे स्पष्टीकरणज्या संस्थेवर सचिन सावंत यांचा आक्षेप आहे, ती संस्था केवळ ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या एका कार्यक्रमासाठी नियुक्त केली नाही. दूरचित्रवाणी, आकाशवाणीवरील विविध शासकीय कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी तिची नियुक्ती केली आहे. केवळ केलेल्या कामांचेच देयक त्यांना अदा केले आहे. न झालेल्या कोणत्याही कामाचे देयक दिलेले नाही. संस्थेची नियुक्ती आॅनलाइन जाहीर निविदा मागवून ई-निविदा पद्धतीने केली. न झालेल्या कार्यक्रमांसाठीही पैसा देण्याची तरतूद करारपत्रात नाही, असे स्पष्टीकरण माहिती व जनसंपर्क विभागाने दिले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnewsबातम्या