शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

रूपाली चाकणकर यांच्यावर आर्थिक आरोप, तृप्ती देसाईंसह पिडितेवर सांगलीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:04 IST

महिला आयोग, पोलिस प्रशासन आणि सत्ताधारी संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही केला

सांगली : कडेगाव येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने केलेल्या बलात्कार प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर आर्थिक आरोप केल्याबद्दल भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई व पिडित तरूणीवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बनाडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत पीडितेने दि. २८ मे रोजी सांगलीत पत्रकार परिषदेत कैफीयत मांडली होती. २०२० मध्ये कडेगावच्या तत्कालीन पोलिस निरीक्षक बिपीन हसबनीस याने स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या निमित्ताने घरी नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. राज्यभर आंदोलन सुरू झाले. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिस अधिकाऱ्याला वाचवण्याची विनंती करून पुनर्वसनाची हमी दिली.

तेव्हा दीड कोटी रूपयांची ऑफर दिल्याचा आरोप पिडितेने केला. तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी सांगलीत हॉटेलमध्ये पिडितेला चार दिवस नजरकैदेत ठेवले. महिला आयोग, पोलिस प्रशासन आणि सत्ताधारी संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही केला.दरम्यान, तृप्ती देसाई व पिडितेने सांगलीत केलेल्या आरोपांची दखल महिला आयोगाने घेतली. त्यानुसार सदस्य सचिव डॉ. बनाडे यांनी दि. ३ जुलै रोजी सांगलीत येऊन विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हंटले आहे, तृप्ती देसाई व पिडितेने सांगलीत येऊन महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी सह्याद्री अतिथी गृहावर पैशाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. संशयित दोघींनी महिला आयोग, पोलिस किंवा अन्य यंत्रणेकडे तक्रार न देता, पुरावा सादर न करता चाकणकर यांच्यावर आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन केली आहे. या फिर्यादीवरून तृप्ती देसाई व पिडित महिलेविरूद्ध बीएनएस ३५६ (२), ३ (५) नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.बीएनएस ३५६ (२), ३ (५) कलम काय आहे?बीएनएस ३५६ (२) नुसार एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे गुन्हा आहे. खोटे आणि अपमानकारक बोलल्यामुळे प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते. प्रतिमा मलिन होऊ शकते. त्याबद्दल या कलमानुसार गुन्हा दाखल केला जातो.