शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

अखेर डेक्कन क्वीन एक्स्प्रेस महिला कर्मचा-यांसह रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 5:02 AM

महिला दिनानिमित्त लोको पायलट, गार्डसह संपूर्ण महिला कर्मचाºयांची नियुक्ती असलेली मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ‘जय शिवाजी जय भवानी’च्या घोषात गुरुवारी सीएसएमटी येथून रवाना झाली. डेक्कन क्वीनची लोको पायलट म्हणून सुरेखा यादव, सहायक लोको पायलट म्हणून तृष्णा जोशी आणि गार्ड म्हणून श्वेता घोणे यांनी डेक्कन क्वीनची धुरा सांभाळली.

मुंबई - महिला दिनानिमित्त लोको पायलट, गार्डसह संपूर्ण महिला कर्मचाºयांची नियुक्ती असलेली मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ‘जय शिवाजी जय भवानी’च्या घोषात गुरुवारी सीएसएमटी येथून रवाना झाली. डेक्कन क्वीनची लोको पायलट म्हणून सुरेखा यादव, सहायक लोको पायलट म्हणून तृष्णा जोशी आणि गार्ड म्हणून श्वेता घोणे यांनी डेक्कन क्वीनची धुरा सांभाळली.सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर संपूर्ण महिला कर्मचा-यांसह मध्य रेल्वेवर डेक्कन क्वीन धावली. मालगाडी, लोकल यांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाºया सुरेखा यादव यांच्याकडे एक्स्प्रेसची धुरा सोपवण्यात आली. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, अशा शुभेच्छा देण्यासाठी स्थानकात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्यासह रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. एक्स्प्रेसला रवाना करण्यासाठी मध्य रेल्वेने जय्यत तयारी केली होती. गुलाब आणि फुलांच्या माळांनी एक्स्प्रेस सजवण्यात आली होती. एक्स्प्रेसच्या महिला बोगीत रंगबिरंगी फुगे लावण्यात आले होते. त्यामुळेच सजवलेल्या एक्स्प्रेससह प्रवाशांना सेल्फी काढण्याचा ‘मोह’ आवरता आला नाही. याआधी डेक्कन क्वीन २०११ साली महिला कर्मचाºयांसह धावली होती, असे रेल्वे विषयातील जाणकार सांगतात.महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी, सूचना स्वीकारण्यासाठी सीएसएमटी येथे मदत कक्षाची उभारणी मध्य रेल्वेतर्फे करण्यात आली होती. महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेवर महिलाभिमुख उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १४ वरील विश्रांतिगृहात सॅनिटरी नॅपकिन पॅड वेडिंग मशीन कार्यान्वित करण्यात आली. त्याच बरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस येथे महिलांच्या चेंजिंग रूममध्ये देखील असे वेडिंग मशीन बसवण्यात आले.डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची लोको पायलट म्हणून सुरेखा यादव, सहायक लोको पायलट म्हणून तृष्णा जोशी आणि गार्ड म्हणून श्वेता घोणे यांनी गुरुवारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची धुरा सांभाळली.सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा!सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर संपूर्ण महिला कर्मचा-यांसह डेक्कन क्वीन गुरुवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना झाली. यावेळी रेल्वेच्या अधिकारी-कर्मचाºयांसह प्रवाशांनीदेखील स्थानकावर गर्दी केली होती. रेल्वेच्या महिला कर्मचाºयांनी सीएसएमटी स्थानकातील सुरेखा यादव यांना ‘गुडी’ची प्रतिकृती देत सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.अशी धावली क्वीनलोको पायलट : सुरेखा यादवसहा. लोको पायलट : तृष्णा जोशीगार्ड : श्वेता गोणेतिकीट तपासनीस : एस. पी. राजहंस, शांती बाला, गीता कुरूप, मेधा पवाररेल्वे सुरक्षा बल : कविता साहू, स्मृती सिंग, ज्योती सिंग, पिंकी सिंग, सरिता सिंगइलेक्ट्रॉनिक अभियंता : योगिता राणे

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Indian Railwayभारतीय रेल्वे