मिर्झापूर प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 16:10 IST2018-05-27T16:10:10+5:302018-05-27T16:10:10+5:30
प्रकल्पाच्या भिंतीचे काम वेगात सुरू असून आगामी पावसाळ्यातच या प्रकल्पात पाणीसाठा होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होण्याची शक्यता आहे.

मिर्झापूर प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
शिरपूरजैन : तब्बल १३ वर्षांपासून रडतखडत सुरू असलेल्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्पाच्या भिंतीचे काम वेगात सुरू असून, आगामी पावसाळ्यातच या प्रकल्पात पाणीसाठा होऊन शेतकºयांना सिंचनासाठी लाभ होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे ६१० हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली येणार आहे.
मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर लघूप्रकल्प विविध तांत्रिक अडचणींच्या कचाट्यात वारंवार सापडल्याने १३ वर्षांपूर्वी सुरू होऊनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नाही. दरम्यान, शेतकºयांसह, संबंधित प्रशासनाच्या वारंवार पाठपुराव्यानंतर लोकमतनेही वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी मिळाली आणि या प्रकल्पाचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. आता या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, प्रकल्पाचा मुख्य भाग असलेल्या भिंतीच्या कामाला वेग देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच हा प्रकल्प कार्यान्वित होऊन परिसरातील ६१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.