शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

‘रेरा’बाबत अंतिम युक्तिवाद पूर्ण , निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला राखून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 03:42 IST

रिअल इस्टेट (रेग्युलेशन्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) अ‍ॅक्ट (रेरा) व त्या अंतर्गत असलेल्या काही तरतुदींच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून याचिकांवरील अंतिम सुनावणी सुरू होती.

मुंबई : रिअल इस्टेट (रेग्युलेशन्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) अ‍ॅक्ट (रेरा) व त्या अंतर्गत असलेल्या काही तरतुदींच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून याचिकांवरील अंतिम सुनावणी सुरू होती. अखेर मंगळवारी पक्षकार, केंद्र सरकार व राज्य सरकारचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला. त्यामुळे न्यायालयाने मंगळवारी या याचिकांवरील निकाल राखून ठेवला.केंद्र सरकारने ग्राहकांच्या हितासाठी नव्या व सध्या सुरू असलेल्या बांधकांना ‘रेरा’अंतर्गत नोंदणी बंधनकारक केली आहे. मात्र या कायद्याला अनेक बड्या विकासकांचा व प्रवर्तकांचा विरोध आहे. ‘रेरा’ व त्यातील काही तरतुदी विकासकांच्या अधिकारांचे उल्लंघन करणाºया आहेत. ‘रेरा’ पूर्वलक्षित प्रभावाने लागू केला आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना हा कायदा लागू केला जाऊ शकत नाही, असे आक्षेप विकासकांनी घेतले.तर केंद्र सरकार व राज्य सरकारने हा कायदा ग्राहकांच्या हिताचा असून, विकासकांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारा नसल्याचे न्यायालयाला सांगितले. ‘रेरा’ अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणारा आहे. काही विकासक ग्राहकांकडून बांधकामासाठी पैसे घेतात आणि ते पैसे अन्य ठिकाणी वळवतात. कित्येक वर्षे प्रकल्प रखडलेला असतो. त्यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसतो, असे केंद्र व राज्य सरकारने न्यायालयाला अंतिम युक्तिवादादरम्यान सांगितले. सरकारच्या या भूमिकेचे समर्थन ‘न्यायालयीन मित्रा’नेही केली. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्या. नरेश पाटील व न्या. राजेश केतकर यांनी याचिकांवरील निर्णय राखून ठेवला.निकालाकडे लक्ष‘रेरा’च्या वैधतेला देशभरातील अनेक विकासकांनी संबंधित राज्यांच्या उच्च न्यायालयात तर काहींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांतील उच्च न्यायालयांना या याचिकांवर सुनावणी न घेण्याचे निर्देश दिले. केवळ मुंबई उच्च न्यायालयाला या याचिकांवर सुनावणी घेऊन निर्णय देण्याचा निर्देश दिला. त्यामुळे देशभरातील सर्व विकासकांचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष आहे.

टॅग्स :real estateबांधकाम उद्योगMumbai High Courtमुंबई हायकोर्ट