शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दप्तर भरा, शाळेत चला; पहिली ते चौथीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार; सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 06:38 IST

शाळा सुरू करण्याच्या निर्णयाची माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात येईल. तसेच पालकांच्या परवानगीनेच या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल.

मुंबई : कोरोनामुळे साधारणत: दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळांतील किलबिलाट पुन्हा सुरू होणार आहे. १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा नियमित सुरू होतील.शाळा सुरू करण्याच्या निर्णयाची माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात येईल. तसेच पालकांच्या परवानगीनेच या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल. शाळेच येण्याचे बंधन विद्यार्थ्यांवर नसेल. इयत्ता पाचवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला. त्यानुसार ग्रामीण भागात ५वी ते १२वी तर शहरी भागात ८वी ते १२वीच्या शाळा-महाविद्यालये सुरू झाली. त्यानंतर ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा विचार सुरू होता. यासाठी आरोग्य विभाग, मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता. बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सशी चर्चाही केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या...- मुलांचे कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली जाईल.- मुलांना एकत्र बसून शिक्षण घेण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यानुसार चर्चा करून निर्णय घेतला. पालक आणि शिक्षकांशीही चर्चा करण्यात आली.- मुलांना सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण वातावरण मिळेल, याची काळजी घेतली जाईल. शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी पुढील सहा दिवस विशेष प्रयत्न केले जातील.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र