शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, शिवसेनेची मागणी  ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 00:39 IST

महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे.

सोलापूर - महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे.कंगना राणावत यांनी महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीर ची तुलना केली होती. यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी 106 जणांनी हौतात्म्य पत्करले त्यांचाही अपमान झाला आहे. मुंबईमध्ये राहून करोडो रुपये कमवायचे नावारूपास यायचे व त्याच महाराष्ट्राला व मुंबईला ट्रक माफियाच्या जवळीक ठेवून बेताल वक्तव्य करायचे. अशा व्यक्तींचा महाराष्ट्र शासनाने त्वरित बंदोबस्त केला पाहिजे.दि. 9 सप्टेंबर रोजी मी मुंबईत येणार आहे कोणाची हिंमत आहे मला कोण आठवतय मी पाहते असे जाहीर आवाहन ह्या कंगनाने प्रशासनाला केले आहे. मस्तवाल कंगना राणावत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून वेळीच कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, विभागीय संघटक महेश धाराशिवकर, परिवहन सदस्य विजय पुकाळे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.आमदार राम कदमवर कारवाई करावी भाजपचे आमदार राम कदम हे कंगना राणावत यांचे मानलेले भाऊ आहेत. त्यांनी कंगना राणावत यांची पाठराखण केली असून महाराष्ट्र व मुंबईची बदनामी करून सामाजिक शांतता बिघडवण्याचे हे षड्यंत्र आहे. या कृतीची दखल घेऊन शासनाने व विधानसभा अध्यक्षांनी राम कदम यांच्या सदस्यत्वाच्या बाबतीत कारवाई करून योग्य तो निर्णय घ्यावा असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाKangana Ranautकंगना राणौतMaharashtraमहाराष्ट्रSolapurसोलापूरPoliticsराजकारण