शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कपड्याच्या दुकानाला भीषण आग

By admin | Updated: December 31, 2014 01:08 IST

सीताबर्डी मार्केटच्या मुख्य मार्गावर असलेल्या टीआयटी गारमेंट न्यू कटपीसवाला या कपड्याच्या दुकानाला मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागून या दुकानातील चार लाखाचे

चार लाखाचे नुकसान : सीताबर्डी मुख्य मार्गावरील घटनानागपूर : सीताबर्डी मार्केटच्या मुख्य मार्गावर असलेल्या टीआयटी गारमेंट न्यू कटपीसवाला या कपड्याच्या दुकानाला मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागून या दुकानातील चार लाखाचे कपडे जळून खाक झाले. दरम्यान अग्निशमन विभागाचे सहा बंब घटनास्थळी पोहोचून त्यांनी दीड तासात आगीवर नियंत्रण मिळविले.सीताबर्डी मार्केटच्या मुख्य मार्गावर राजेश गणेशलाल अग्रवाल (४५) यांचे कपड्याचे दुकान आहे. दुसऱ्या माळ्यावर त्यांचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये मंगळवारी दुपारी १२ वाजता शॉट सर्किटमुळे अचानक आग लागली. कपड्याचे दुकान असल्यामुळे अल्पावधीतच या आगीने रुद्र रूप धारण केले. दरम्यान दीपक अग्रवाल यांनी मोबाईलवरून अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. अग्निशमन विभागाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु दुसऱ्या माळ्यावरील गोडाऊनला टिनाचे पत्रे लावलेले असल्यामुळे गोडाऊनमध्ये पाणी जात नव्हते. त्यावर झाडे लावण्यासाठी असलेल्या सिमेंटच्या कुंड्या या टिनपत्र्यांवर मारून हे पत्रे तोडण्यात आले. त्यानंतर आत पाणी फवारण्यात आले. दीड तासाच्या कालावधीनंतर अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यात दुकानातील चार लाखाच्या कपड्यांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली असून दुकानाचे संचालक राजेश गणेशलाल अग्रवाल यांनी दुकानातील २० लाखाच्या मालाचे नुकसान झाल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली आहे. (प्रतिनिधी)