शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

भय्यू महाराज व युवतीत व्हायचे अश्लील संभाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 08:07 IST

पोलिसांचा दावा : महाराजांचा नंबर ‘आ हो’ नावाने केला होता सेव्ह

इंदूर (मध्य प्रदेश) : राष्ट्रसंत भय्यू महाराज यांचे आत्महत्या प्रकरण ज्या युवतीभोवती फिरत होते ती युवती व महाराज यांच्यात अतिशय उघडपणे अश्लील संभाषण व्हायचे, असा दावा पोलिसांनी केला आहे. याच युवतीने आधी ‘भय्युजी महाराज मला मुलीसारखे मानत’, असे म्हटले होते. याच कारणावरून भय्युजी महाराजांची मुलगी संतापायची. महाराजांचे दोन विवाह झाले होते. दुसरा प्रेमविवाह होता.

पोलिसांनी सांगितले की, त्या मुलीच्या मोबाईलमध्ये महाराजांचा मोबाईल नंबर ‘आ हो’ या नावाने सेव्ह होता. युवतीच्या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवला गेल्यावर हे स्पष्ट झाले. हे दोघे अतिशय उघडपणे अश्लील संभाषण करायचे याचे पुरावेही मिळाले आहेत. पोलीस उप महानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्र यांच्यानुसार अहवाल तयार करण्याच्या पायरीपर्यंत पोलीस पोहोचले आहेत. प्राथमिक चौकशीत महाराज आणि ती संशयित युवती यांच्यात अतिशय जवळचे संबंध निर्माण झाले होते हे स्पष्ट झाले आहे.तपास तुकडीतील अधिकाऱ्यानुसार ही युवती व विनायकदेखील एकमेकांना मेसेजेस करायचे. त्यात युवतीने ‘भाई, आपण प्लॅनमध्ये यशस्वी होऊ की नाही’ असे अनेकवेळा विचारले. त्यावर विनायक तिला प्लॅन यशस्वी होण्याची खात्री द्यायचा. या माहितीनंतर मंगळवारी अचानक एक तुकडी महाराजांच्या घरी ‘शिवनेरी’वर धडकली व तिने पत्नी आयुषी, सेवेकरी पी. डी. उर्फ प्रवीण देशमुख आणि बहीण रेणु, मोनू यांची चौकशी केली. पोलिसांनी महाराजांचे सात मोबाईल फोन जप्त केले. त्यातील डेटा डिलीट झालेला आहे. तो पोलीस पुन्हा मिळवतील.

विष घ्यायची धमकी दिली होतीभय्युजी महाराजांची धाकटी बहीण मोनू उर्फ अनुराधा (५२) हिने विनायक आणि युवतीवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. मोनू म्हणाली की, आत्महत्येमागे युवती, विनायक, शरद देशमुख आणि शेखर पंडितचा हात आहे. युवतीने संपूर्ण घर ताब्यात घेतले होते. ती नोकरांना महाराजांची पत्नी असल्यासारखे आदेश द्यायची. जेव्हा महाराज आयुषीशी लग्न करीत होते तेव्हा विनायकने युवतीला घरी बोलावले. मोठी बहीण रेणू आयुषीला दागिने व कपडे देण्यासाठी निघाली होती. संधी मिळताच विनायक युवतीला बेडरूममध्ये घेऊन आला. तिने महाराजांना माझ्याशी लग्न केले नाही तर मी विष घेईन, अशी धमकी दिली. तेव्हा कुटुंबियांनी तिला धक्का देऊन बाहेर काढले.मोनू हिच्या माहितीनुसार विनायक महाराजांना एकटे असल्याचे पाहताच युवतीला फोन करायचा. त्यांच्याशी दमदाटीने बोलायचा. शेखर आणि विनायक महाराजांना कुटुंबियांपासून दूर करू पाहत होते. विनायक युवतीला घराची मालकीण बनवण्याचे कटकारस्थान करीत होता. मी पोलिसांना पूर्ण माहिती दिली आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मोनू हिने केली आहे. पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही तिने केला आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी