शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत ‘नोटा’चा वापर अधिक होण्याची भीती

By admin | Updated: April 4, 2017 03:30 IST

पनवेल महानगरपालिका निवडणूक मे महिन्यात पार पडणार आहे. मात्र मतदार याद्यांमधील गोंधळामुळे सामान्य मतदार दुखावला गेल्याची शक्यता आहे.

वैभव गायकर,पनवेल- पनवेल महानगरपालिका निवडणूक मे महिन्यात पार पडणार आहे. मात्र मतदार याद्यांमधील गोंधळामुळे सामान्य मतदार दुखावला गेल्याची शक्यता आहे. एक नव्हे तर दोन वेळा हरकती नोंदवून देखील एका प्रभागाची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने नाराज मतदारांकडून ‘नोटा’ बटण वापरण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येत आहे. कारण आपल्या प्रभागातील उमेदवार सोडून दुसऱ्या प्रभागातील अनोळखी उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा नोटा बटण दाबलेलेच बरे, असा प्रश्न काही मतदार उपस्थित करीत आहेत. पनवेल महापालिकेत एकूण १८ प्रभाग आहेत. जवळजवळ २० हजार मतदारांचा कमीत कमी एक प्रभाग आहे. काही प्रभागात ३० हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत. अशा स्थितीत शेकडो मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेली असल्याने सामान्य मतदार नाराज झाला आहे. विशेष म्हणजे ट्रू व्होटर या निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरवर तक्रारी नोंदवून देखील काहीच फरक पडला नसल्याने अनेक मतदारांचा हिरमोड झाला आहे. ३१ मार्च रोजी या याद्यांच्या झालेल्या घोळासंदर्भात हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख आहे. मात्र पहिल्या वेळेला हरकती नोंदवून काहीच उपयोग झाला नसल्याने अनेक मतदारांना या वेळेला नावे सुरळीत प्रकारे आपल्याच प्रभागात येतील असा विश्वास नसल्याने ‘नोटा’चा उपयोग होण्याची शक्यता खारघर मधील रहिवासी सचिन सावंत, चंद्रकांत कदम यांनी व्यक्त केली. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगर पालिकेत एकूण ४ लाख २५ हजार ४५३ एवढी मतदार संख्या आहे. सर्व प्रभागांचा आढावा घेतल्यानंतर जवळजवळ ४० हजार मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. त्यामुळे आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्याची संधी त्यांना मिळणार नसल्याने ‘नोटा’चा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वतीने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना शुक्रवारी निवेदन दिले. मतदार याद्यांचा घोळ झाल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली.