fear in the minds of tribals about caa nrc says cm uddhav thackeray | सीएए, एनआरसीवरून आदिवासी, दुर्बलांच्या मनात भीती- मुख्यमंत्री

सीएए, एनआरसीवरून आदिवासी, दुर्बलांच्या मनात भीती- मुख्यमंत्री

मुंबई : आपण जर प्रमाणपत्रे, कागदपत्रे पुरवू शकलो नाही तर आपल्याला मिळणा-या सोयीसुविधा तर जातीलच पण आपले स्वातंत्रयही हिरावून घेतले जाईल, अशी भीती सीएए,एनआरसी, एनपीआर यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी, दुर्बल वंचित घटक यांच्या मनात दिसत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. मात्र, भीती वाटण्याचे कारण नाही आपले सरकार या समाजांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असे ते म्हणाले.

राज्पपालांनी मराठीतून अभिभाषण दिले या बद्दल अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचे यंदाचे साठावे म्हणजे हीरकमहोत्सवी वर्ष आहे.संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा राज्याचा हिरकमहोत्स्व साजरा करण्यात येणार आहे.विरोधी पक्षानेही यासाठी सरकारला साथ दयावी असे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्षाने महाविकास आघाडीच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कारकिर्दीत अतिशय उत्तम सहकार्य केले आहे.पुढची पाच-पन्नास वर्षे असेच सहकार्य आम्हाला मिळत राहील असा टोलाही मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी भाजपला हाणला.

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रातील मराठी बांधव हा देखील हिंदूच आहे. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न असूनही आजही या मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत. महाविकास आघाडी सरकार हे स्थगिती सरकार असल्याची करण्यात येणारी ओरड खोटी आहे. कोणत्याही विकासकामांना आम्ही स्थगिती दिलेली नाही.आम्ही विकासाचे मारेकरी नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक कामांना स्थगिती देण्यात आली आहे.आपल्याकडे त्याची कागदपत्रे असल्याचे म्हटले.

मंत्री धनंजय मुंडे यांनी मुनगंटीवार यांच्या म्हणण्यावर आक्षेप घेतला. तेव्हा हवे तर यावर आपण हक्कभंग टाकतो असे मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करत सुधीरभाऊ हक्कभंग जरूर टाका पण आधी हक्क समजून घ्या.मी स्थगिती दिलेली नाही तर केवळ प्राधान्यक्रम ठरविला असल्याचे आधीच स्पष्ट केल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री कार्यालय आता तालुक्यापर्यंत
सर्वसामान्य जनतेला छोटया छोटया कामांसाठी मंत्रालयाचे हेलपाटे घालावे लागू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला.आता याचा विस्तार तालुका पातळीवरही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबईत रंगभूमीचे दालन उभारणार
समाजाच्या जडणघडणीत मराठी रंगभूमीचे योगदान मोठे आहे.याच रंगभूमीचा इतिहास उलगडून सांगण्यासाठी मुंबईत रंगभूमीचे दालन उभारण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: fear in the minds of tribals about caa nrc says cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.