शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

भाजपचे 'ते' साडे तीन लोक तुरुंगात जाणार; दोघांची नावं समजली, खुद्द राऊतांनी इशाऱ्यातून सांगितली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 09:07 IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे ट्विटमधून महत्त्वाचे संकेत; दोघांचा अप्रत्यक्ष उल्लेख

मुंबई: हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो बरबाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला परवा रोखठोक इशारा दिला. पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक कोठडीत असतील, असंदेखील राऊत म्हणाले. काल राऊत यांनी साडे तीन लोकांची नावं सांगितली नाहीत. मात्र आज सकाळीच राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे मोठे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे साडे तीनमधील दोन नेत्यांची नावं समोर आली आहेत.

'बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch!कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!', असं ट्विट राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी या बाप बेट्यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण संजय राऊत या ट्विटमधून भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांबद्दल बोलत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काल शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी सर्वाधिक शाब्दिक हल्ले आणि आरोप सोमय्या पिता-पुत्रांवरच केले होते. सोमय्यांचा उल्लेख तर राऊत यांनी 'मुलुंडचा दलाल' असा केला होता.

सोमय्यांबद्दल काय म्हणाले राऊत?भाजपाचेकिरीट सोमय्या ईडीचे दलाल आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही-खिचडी खात असतो, असा दावाही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच सध्या फक्त ट्रेलर आहे, पुढील काळात काही व्हिडीओ समोर आणणार, असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी केला.

नील सोमय्यांबद्दल काय बोलले राऊत?पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा निल सोमय्या यांना अटक करा असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं होतं. 

साडेतीन नेत्यांबद्दल काय म्हणाले होते राऊत?तुरुंगात जाणारे भाजपचे ते साडेतीन लोक कोण? अशी विचारणा शिवसेना भवनातून बाहेर पडताना काल पत्रकारांनी राऊतांकडे केली होती. त्यावर ते लोक कोण हे उद्यापासून कळेल आणि ते आत गेल्यावर मोजत बसा असं उत्तर राऊत यांनी दिलं. त्याआधी शिवसेना भवनातील पत्रकार परिषद संपून राऊत खुर्चीवरून उठतानाही त्यांना हा प्रश्न विचारला गेला. तेव्हा ते साडे तीन लोक आहेत. त्यातला कोणी अर्धा आहे, कोणी पाव आहे, तर कोणी चार आण्याचा असल्याचं विधान राऊत यांनी केलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपा