अकोला-खामगाव रोडवर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 14:49 IST2017-08-16T13:17:45+5:302017-08-16T14:49:37+5:30

अकोला- खामगाव रोडवर भीषण अपघात झाला आहे.

Fatal accidents on Akola-Khamgaon road; Death of fours | अकोला-खामगाव रोडवर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

अकोला-खामगाव रोडवर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

ठळक मुद्देअकोला- खामगाव रोडवर भीषण अपघात झाला आहे.अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे

खामगाव, दि. 16- अकोला- खामगाव रोडवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भरधाव ट्रकने रिक्षेला जबर धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी ११.५० वाजता खामगाव- अकोला रोडवर घडली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती.

बुलडाणा येथील ईक्बाल चौक परिसरात राहणारे मजूर कामासाठी बाळापूर इथे जात होते. यावेळी अॅपे रिक्षातून एकूण दहा प्रवासी प्रवास करत होते. त्याचवेळी अकोला - खामगाव या मार्गावरील टेंभूर्णा फाट्यावर या रिक्षाला ट्रकनं जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षातील चौघा प्रवाशांचा जागीच मृत्यु झाला.  गंभीर जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह फरार झाला होता. मात्र, खामगाव ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी करून ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे.

Web Title: Fatal accidents on Akola-Khamgaon road; Death of fours