शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्यांचा शेतकऱ्यांनीच पराभव केला- सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 6:28 PM

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यापासून शिवसेनेने रोखलं आहे.

कोल्हापूरः हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यापासून शिवसेनेने रोखलं आहे. शिवसेनेचे धैर्यशील माने यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यानंतर आता शेट्टीच्या या पराभवावर त्यांचे एकेकाळचे साथीदार आणि सध्याचे विरोधक सदाभाऊ खोत यांनी जहरी टीका केली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, हा शेतकरी चळवळीचा विजय आहे. स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्यांचा शेतकऱ्यांनीच पराभव केला आणि गर्वहरण केले आहे. शेतकरी चळवळीचा झेंडा हातात घेऊन बळीराजाचे प्रश्न मांडत राहू, असा विश्वासही सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. दहा वर्षांपूर्वी शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील यांच्या मातोश्री निवेदिता माने यांचा पराभव केला होता. धैर्यशील यांनी दहा वर्षांनंतर या पराभवचा बदला घेत शेट्टींना अस्मान दाखवलं. निवेदिता माने 1999 आणि 2004 मध्ये इचलकरंजी मतदारसंघातून निवडून आल्या. राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी होत त्यांनी दिल्ली गाठली. त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यामुळे 2009मध्ये निवेदिता माने हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. मात्र राजू शेट्टींनी त्यांचा जवळपास 95 हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे त्यांची हॅट्रिक हुकली.

राजू शेट्टींनी 2009 पाठोपाठ 2014 मध्येही विजय मिळवत दिल्ली गाठली. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या कल्लाप्पा आवडेंचा पावणे दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यामुळे यंदा राजू शेट्टींना यंदा हॅट्रिकची संधी होती. मात्र निवेदिता मानेंचे चिरंजीव धैर्यशील यांनी त्यांच्यापुढे आव्हान उभं केलं. सध्या त्यांच्याकडे जवळपास 1 लाख मतांची आघाडी आहे. त्यामुळे माने यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.  

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९hatkanangle-pcहातकणंगले